Rohit Sharma Abused Umpire In IND vs ENG Test: भारतीय संघ सध्या धर्मशाला येथे इंग्लंड विरुद्ध 5 वा कसोटी सामना खेळत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजी करताना भारताने कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन यांच्या नऊ विकेट्सच्या जोरावर बेन स्टोक्सच्या संघाला २१८ धावांत गुंडाळले होते. या सामन्यातील कामगिरीसह कुलदीप यादवने पाच विकेट्स घेण्याचा टप्पा पूर्ण केला तर आश्विनने सुद्धा कारकिर्दितीतील १०० वा कसोटी सामना खेळताना चार विकेट्ससह दमदार खेळी दाखवली. या धडाकेबाज फिरकी गोलंदाजीच्या कामगिरीनंतर टीम इंडिया सकारात्मक दृष्टिकोन ठेवून फलंदाजीसाठी उतरली होती. फलंदाजीच्या दरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये अंपायरने बाद दिल्यावर रोहितची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरतेय.

भारताच्या पहिल्या डावाच्या सातव्या षटकlत पंचांनी रोहित शर्माला पायचित बाद घोषित केलं होतं. अंपायर जोएल विल्सनने बाद देण्यासाठी बोट वर करताच भारतीय कर्णधाराने लगेचच डीआरएस घेण्यास सांगितले. रोहित शर्माला बाद नसण्याबाबत आत्मविश्वास होता हे डीआरएस घेतेवेळी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. डीआरएस घेण्याची खूण करताच रोहितने हसून अंपायरसाठी अपशब्द उच्चारल्याचे सुद्धा कॅमेऱ्यात कैद झाले आणि आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे

Video: रोहित शर्मा भरमैदानात पंचांना म्हणाला…

हे ही वाचा<< IND vs ENG 5th Test: रोहित शुबमनचा शतकी तडाखा, इंग्लंडचा संघ बॅकफूटवर

दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी सामन्यात रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. रोहित शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ५० षटकार पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई फलंदाज ठरला आहे. तसेच जागतिक क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये १००० धावा पूर्ण करण्याची कामगिरी सुद्धा त्याने केली आहे. इंग्लंड विरुद्ध सामन्यात रोहितने धावांचे शतकही पार केले आहे.