सध्या देशात लॉकडाउन सुरु असल्यामुळे सामान्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटीदेखील घरीच आहेत. मात्र या काळतही अभिनेत्री अनुष्का शर्मा सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी ती तिच्या वेबसीरिजमुळे चर्चिली जात होती. त्यानंतर ती एका फोटोशूटमधील बोल्ड लूकमुळे चर्चेत होती. या साऱ्यानंतर आता विराट कोहलीदेखील एका नव्या लूकमध्ये दिसून आला आहे. BCCI टीव्हीच्या माध्यमातून सलामीवीर मयंक अग्रवाल हा ओपन नेट्स विथ मयंक या कार्यक्रमात विविध क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेतो. या कार्यक्रमात आगामी मुलाखत कर्णधार विराट कोहलीची आहे. या मुलाखतीचा टीझर BCCI च्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला. त्यावेळी विराटचा नवा रेट्रो लूक समोर आला. मयंकने विराटच्या गॉगलची स्तुती केल्यानंतर विराटने स्वत:च रेट्रो लूकबद्दल सांगितलं. Look who's gone retro Watch out for this episode of #OpenNetsWithMayank featuring #KingKohli Coming up soon on @imVkohli pic.twitter.com/PP4PP5bXhk — BCCI (@BCCI) July 22, 2020 विराट सध्या पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत घरात आहे. ते दोघेही झकासपैकी एकत्र वेळ घालवत आहेत. लॉकडाउन सुरू झाल्यापासून विराट-अनुष्काने अनेक फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी तर हे दोघे आपल्या इमारतीच्या आवारात क्रिकेट खेळतानाही दिसले होते. पण अनुष्काची सोबत असतानाही विराट एक गोष्ट मिस करतोय. विराटने एक छान निसर्गरम्य ठिकाणाचा फोटो पोस्ट करत, ‘मी विविध ठिकाणी फिरणं, भ्रमण करणं मिस करतोय’, असं म्हटलं होतं.