Bitter Gourd Seed Benefits : कारल्याच्या बिया त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. त्यातील जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. कारल्याच्या बियांचा फेस पॅक त्वचेला फायदेशीर आहे. कारल्याची भाजी केवळ आरोग्यासाठीच नाही, तर चेहऱ्यासाठीही तितकीच फायदेशीर आहे. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी कारल्याच्या बिया खूप फायदेशीर आहेत. कारल्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि खनिजे आढळतात. चला तर मग जाणून घेऊ कारल्याच्या बियांचा फेस पॅक कसा बनवायचा ते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारल्याच्या बियांचा पॅक साहित्य:

२ चमचे कारल्याच्या बिया
१ चमचे मध
१ चमचा दही

कारल्याच्या बियांचा पॅक कृती

  • कारल्याच्या बियांचा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम कारल्याच्या बिया चांगल्या प्रकारे धुऊन घ्या. त्या मिक्सरमध्ये किंवा अन्य प्रकारे बारीक करा.
  • आता त्यात मध आणि दही घालून मिक्स करा.
  • ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे राहू द्या.
  • त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
  • आठवड्यातून २-३ वेळा असे केल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल.
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हा पॅक स्टोअर करू शकता. हा पॅक एक आठवड्यासाठी फ्रिजमध्ये ठेवता येतो.
  • कारल्याच्या बियांपासून बनवलेला फेस पॅक तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करील.

हेही वाचा >> Kitchen Jugaad Video: रात्री झोपण्याआधी गॅसवर कांदे नक्की ठेवा; कुटुंबावरील मोठा धोका टळेल

कारल्याच्या बिया त्वचेवर लावल्याचे फायदे

  • कारल्याच्या बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन ई तुमची त्वचा हायड्रेट ठेवते.
  • बियांमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेच्या पेशींना फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवण्यास मदत करतात. हे वृद्धत्व देखील प्रतिबंधित करते.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bitter gourd seed face pack for glowing skin try this face pack for soft skin srk
First published on: 06-10-2023 at 13:27 IST