भारतातील इन्फ्लमेटरी बाऊल डिसीज (IBD – आतड्यांच्या आजाराचा एक प्रकार) प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे; जी गेल्या ३० वर्षांमध्ये दुप्पट झाली आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेसच्या अहवालानुसार, असे दिसते, “अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नपदार्थांचा वाढता वापर याला कारणीभूत ठरू शकतो.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“फॅट्स आणि साखरयुक्त पदार्थ, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्सचे वाढलेले सेवन व फूड ॲडिटिव्ह्जच्या संपर्कात येणे या गोष्टी IBD संख्या वाढविण्यासाठी कारणीभूत असल्याचे मानले जाते”, असे चंदिगड PGIMER, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे अतिरिक्त प्राध्यापक असलेल्या डॉ. विशाल शर्मा यांनी सांगितले आहे. “अल्ट्रा-प्रोसेस्ड केलेल्या अन्नपदार्थांचे जास्त सेवन क्रोहन रोगाला ( Crohn’s disease) कारणीभूत असू शकते. IBD चा एक प्रकार; ज्यामध्ये जीआय (GI ) ट्रॅक्टचा तीव्र दाह समाविष्ट असतो; जो पोटापासून गुदद्वारापर्यंत विस्तारित होत असतो”, असे क्लिनिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या सुमारे एक दशलक्ष सहभागींचा पद्धतशीरपणे पुन्हा अभ्यास केल्यानंतर दिसूते.

अल्ट्रा-प्रोसेस पदार्थ काय आहेत?

अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ हे एक किंवा अनेक औद्योगिक प्रक्रिया किंवा तंत्र वापरून उत्पादित केलेले औद्योगिक-प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ ( industrially-processed foods) म्हणून ओळखले जातात. त्यामध्ये रासायनिक बदलांचा समावेश असू शकतो किंवा नसू शकतो. पौष्टिक संतुलनाकडे दुर्लक्ष करीत चव आणि खाद्यपदार्थ टिकण्याचा काळ वाढविण्यासाठी ॲडिटिव्ह्ज (Additives) वापरले जातात; ज्यामध्ये भरपूर प्रमाणात ऊर्जा निर्माण करणारे घटक असतात. या ॲडिटिव्ह्ज मध्ये रंग, स्टॅबिलायझर्स, स्वाद वाढविणारे, इमल्सीफायर्स व डिफोमिंग एजंट असतात. अल्ट्रा-प्रोसेस्ड केलेले पदार्थ पूर्णपणे बदललेले असतात आणि त्यात अस्वास्थ्यकर फॅट्स, शुद्ध साखर व मीठ जास्त असते. म्हणून जेव्हा आपण असे पदार्थ खातो तेव्हा आपण आपल्या आहारात अधिक पौष्टिक पदार्थांसाठीची आवश्यक जागा कमी करतो.

उदाहरणार्थ, जेव्हा आपण बारीक केलेले नट्स आणि त्याच्या तेलाऐवजी थेट संपूर्ण नट्स खातो तेव्हा शरीरातील कमी फॅट्स शोषून घेतले जातात. हे सर्व नंतर आतड्यांतील जीवाणूंवर परिणाम करतात आणि त्यामुळे जळजळ होते.

हेही वाचा – रोजच्या आहारात प्रथिनांचा समावेश कसा करावा? जाणून घ्या आठ सोपे मार्ग

अल्ट्रा-प्रोसेस्ड केलेले पदार्थ कसे ओळखायचे?

हे खाद्यपदार्थ ओळखणे कठीण आहे. कारण उत्पादनाच्या लेबलवर औद्योगिक तंत्रे किंवा प्रक्रियांचा समावेश केलेला नाही. ॲडिटीव्ह, रंग, फ्लेवरिंग एजंट्स, स्वीटनर किंवा इमल्सीफायर्स किती प्रमाणात आहे ते पाहा.

अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्सच्या वाढत्या सेवनाबाबत मुख्य चिंता काय आहेत?

बहुतेक अल्ट्रा प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमध्ये भरपूर ऊर्जा असते आणि त्यात जाडसर घटक नसतात किंवा कमी प्रमाणात असतात. त्यात जास्त साखर आणि फॅट्स असते आणि ते संरक्षणात्मक फायबर्स, प्रोटीन, पोटॅशियम व फायटोएस्ट्रोजेन्सचा समावेश असतो. जीवनशैलीतील अतिरिक्त धोकादायक घटकांसह (बैठी जीवनशैली, कमी शारीरिक हालचाली), मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग, नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत आणि कर्करोग यांसारख्या बिगर-संसर्गजन्य रोगांच्या उत्पत्तीसाठी हे एक ‘प्राइमॉरडियल सूप’ (‘primordial soup’) आहे. अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्सचे जास्त सेवन केल्याने सर्व कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका वाढतो.

हेही वाचा – खाण्यापूर्वी एक ते दोन तास ठेवा मशरूमला सूर्यप्रकाशात; व्हिटॅमिन डीची कमतरता राहील दूर? तज्ज्ञांनी सांगितलेलं सूत्र समजून घ्या

अल्ट्रा प्रोसेस्ड अन्न आतड्याच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात?

मोठ्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अल्ट्रा प्रोसेस्ड अन्न हे निरोगी आतड्यांतील अडथळ्यांचे नुकसान करतात; जे आपले अँटीजेनपासून संरक्षण करतात. आतड्यांची क्षमता वाढल्याने आतड्यांसंबंधीची जळजळ वाढते; ज्यामुळे IBD, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) व कोलन कर्करोगासह (Colon cancer) गॅस्ट्रोइंटेस्टायनल रोगांचा धोका वाढतो.

IBD टाळण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी आहार योजनेसाठी तुमच्या शिफारसी काय आहेत?

अधिक फळे, भाज्या आणि फायबर वापरा. बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळा. जास्त कर्बोदके आणि फॅट्सचे सेवन टाळा. अन्न चांगले शिजविलेले असावे. अगदी पॅकेट नाश्ता, अन्नधान्य आणि मोठ्या प्रमाणात उत्पादित ब्रेड हे अल्ट्रा-प्रक्रिया केलेले पदार्थ आहेत.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is your morning bread an enemy of gut health heres why you should junk all ultra processed foods snk