पल्लवी सावंत पटवर्धन
Health special : आहारात ताजे घरगुती पदार्थ नसणं हे देखील आजारपणाचे एक महत्त्वाचे कारण आहे. आपण घरगुती पदार्थ खातो त्यावेळेस आजारी पडण्याचं प्रमाण कमी असतं. मुळात घरगुती अन्न बहुतांश वेळेस ताजंच असतं. मात्र तुम्ही बाहेरचं अन्न वारंवार खात राहता त्यावेळी त्यासाठी वापरलं गेलेलं तेल, त्यासाठी वापरले गेलेले अन्नपदार्थ हेदेखील चांगलेच वापरलेले असतात किंवा ताजे असतात याची कोणतीही खात्री नसते. अलीकडच्या अभ्यासात असं लक्षात आलं आहे की, सध्या वाढलेलं आजारांचं प्रमाण हे बाहेरून अन्न मागवून खाण्याच्या वाढलेल्या प्रवृत्तीशी समांतर जाणारं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तब्येत का बिघडते?

बाहेरचं खाणं वाढलं की, तब्येत बिघडते असे म्हणतो त्यावेळेला आपल्या पोटाचे आरोग्य सुरुवातीला बिघडत असतं आणि त्यानंतर त्याचा तब्येतीवर परिणाम होतो. तुमची रोगप्रतिकारक शक्तीच कमी असते त्या वेळेला तुमच्या तब्येतीवर लवकर परिणाम होतो. म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये आवश्यक प्रमाणामध्ये जीवनसत्वांचं किंवा खनिजांचे प्रमाण कमी झालेलं असतं. अनेकदा पदार्थ चविष्ट करण्याच्या नादात आपण जास्त प्रमाणात तेल वापरतो किंवा एखादा अन्नपदार्थ किंवा अन्नाला चव आणणारा पदार्थ जास्तीचा वापरून तयार केला जातो त्यावेळेस प्रमाण चुकलेलं असतं.

आणखी वाचा-Health Special: थंडीत उडदाचा वापर जेवणात कसा करावा?

माफक प्रमाण महत्त्वाचं

आहाराचं मूळ तत्व हे माफक प्रमाणात आहार हेच आहे, तसंच पाककलेचं तत्त्वदेखील माफक प्रमाणाचंच आहे. अन्न तयार करण्याचे देखील मूलतत्व हे माफक प्रमाणात अन्नघटक वापरण्याचेच आहे. त्यामुळे जेवण करताना हा नियम लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. जेवणामध्ये मीठ जास्त टाकलं की, त्यातील आवश्यक जीवनसत्वांवर त्याचा वाईट परिणाम होतो जेवणामध्ये साखर जास्त प्रमाणात असेल तर शरीरात आवश्यक असणाऱ्या सूक्ष्माणूंचे (गट मायक्रोब) प्रमाण कमी होऊन जातं त्यामुळे उत्तम आहारासाठी अन्नघटकांचं योग्य प्रमाण आवश्यक असतं.

सर्दी पडसं

सध्या वातावरणातील बदलांमुळे सर्वत्र सर्दी, पडसे आणि ताप यासारखे आजार सुरू आहेत. सर्दी पडसे होताना विविध विषाणू कारणीभूत ठरतात. संसर्गजन्य सर्दी पडसे होताना सुरुवातीला घसा दुखणे, डोकेदुखी, अस्वस्थ वाटणे आणि हळूहळू नाक चोंदणे असे प्रकार होत सर्दी पडसे बळावू शकते. ताप येऊ लागतो आणि अतिशय थकवा येतो. २-३ दिवस साधारण संसर्ग वाटणाऱ्या सर्दी खोकल्याचा जोर उतरू शकतो. वेळेत योग्य उपचार न केल्यास मात्र ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे त्यांच्यामध्ये याचे प्रमाण पाच ते सात दिवस इतपत टिकून राहते. वेळेत डॉक्तरांकडे तर जावेच आणि सोबत काही घरगुती उपायदेखील करावेत.

आणखी वाचा-Health Special : पॉझिटिव्ह पालकत्व म्हणजे नेमकं काय? 

आजच्या लेखात सर्दी पडसे कमी करणारे आहारशास्त्रातील उपचार जाणून घेऊ .

अनेकदा सर्दी खोकल्यावर उपचार करताना आवश्यक पदार्थांचा अर्क पाण्यात एकत्र करून चहाच्या किंवा काढ्याच्या स्वरूपात प्यायला जाऊ शकतो. आहारशास्त्रानुसार उपचारांचा तक्ता खालीलप्रमाणे –

सर्दी बळावण्यापूर्वी व नंतरही हे घरगुती उपचार केले जाऊ शकतात. पण सुरुवातीच्या दिवसांमध्ये सर्दी रोखण्यास त्यामुळे मदत होईल. कारण या उपचारांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याची क्षमता अधिक आहे. वेलीच उपचार केलेत तर विकार बळावणार नाहीत!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the home dietary remedies for common cold hldc mrj