आजकाल बहुतेक लोकांना रक्तदाबाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. अनेकांना उच्च रक्तदाबाचा तर काहींना कमी रक्तदाबाचा त्रास होतो. धावपळीचे जीवन, ताणतणाव आदी गोष्टींमुळे लोकांना हा त्रास होत असतो. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, रक्तवाहिन्यांसंबंधीचा आजार, मूत्रपिंडाचा आजार यांसारख्या अनेक आरोग्य समस्यांचे हे प्रमुख कारण आहे. रक्तदाब हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. जर रक्तदाब मर्यादेपलीकडे वाढला, तर मोठ्या समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासाठी केल्या गेलेल्या डॉक्टरांच्या सूचनांचे पालन केले गेले पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय चक्कर येत असेल, अशक्तपणा जाणवत असेल, तसेच अचानक घाम येणे, अस्वस्थ वाटणे व श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, त्वचेवर लालसर पुरळ येणे अशा समस्या दिसून येत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही कारणे रक्तदाबासारख्या आजाराचा संकेत असू शकतात. रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळेत औषध घेणे आवश्यक असते. पण रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते का, याच विषयावर नवी दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार, डॉ. सुरंजित चॅटर्जी यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

डॉ. चॅटर्जी सांगतात, “जीवनशैली आणि आहारात बदल करून औषधांशिवाय रक्तदाब नियंत्रित करू शकता, असे नाही. सामान्यतः अशा रुग्णांना रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधे घेणे फार गरजेचे आहे. खरे तर औषधे मधेच थांबविल्याने अनारोग्याची लक्षणे पुन्हा उद्भवू शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही उच्च रक्तदाबासाठी औषधे घेत असाल आणि अचानक थांबलात, तर तुमचा रक्तदाब पुन्हा वाढू शकतो; ज्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक यांसारखी गुंतागुंत होण्याचा धोका असतो.

(हे ही वाचा : आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा )

“स्थूलता, धावपळीची जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान, असंतुलित आहार यांसारख्या जोखमीच्या घटकांमुळे तुमचा रक्तदाब अचानक वाढू किंवा कमी होऊ शकतो. परंतु, या बाबींचे औषधे आदींद्वारे योग्य रीतीने व्यवस्थापन केले गेले, तर तुमचा रक्तदाब नियंत्रणात येऊ शकतो. मग तुमचे डॉक्टर तुमच्या औषधाचा डोस हळूहळू कमी करतील आणि एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीत तुमची स्थिती पाहतील. औषधोपचार बंद करणे नेहमीच योग्य ठरू शकत नाही. कारण- सर्व बदल करण्यायोग्य जोखमीचे घटक कमी करण्याच्या दृष्टीने रुग्ण नेहमीच त्यांच्या दिनचर्येशी सुसंगत नसतात. न बदलता येण्याजोगे जोखमीचे घटक असलेल्यांसाठी जीवनशैलीतील बदल रक्तदाब कमी करण्यासाठी पुरेसे नसतील आणि त्यांना औषधांची आवश्यकता असेल, तर या ट्रिगर्समध्ये मधुमेह, उच्च रक्तदाबाचा कौटुंबिक इतिहास, वृद्धापकाळ, कर्करोग व दीर्घकालीन मूत्रपिंडाचे रोग यांसारख्या आजारांचा समावेश असू शकतो.”

या प्रकरणांमध्ये औषधे वेळेपूर्वी बंद केल्याने स्थिती आणखी बिघडू शकते. मधुमेह, दमा किंवा मनोविकारांसारख्या दीर्घकालीन आजारांचे औषधोपचाराद्वारे सातत्यपूर्ण व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असते. योग्य मार्गदर्शनाशिवाय ही औषधे बंद केल्याने आरोग्य बिघडू शकते आणि संभाव्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते.

काही औषधे, विशेषत: मनोविकारांसारखी स्थिती किंवा जुनाट आजारांसाठी, माघार घेण्याची लक्षणे किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया टाळण्यासाठी वैद्यकीय देखरेखीखाली हळूहळू कमी होण्याची प्रक्रिया आवश्यक असते. ही औषधे अचानक बंद करणे धोकादायक ठरू शकते आणि त्यामुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात,” असे डॉ. चॅटर्जी यांनी स्पष्ट केले.

“जेव्हा आपण दिली गेलेली औषधे पूर्ण केली नाहीत, तर त्यामुळे तब्येत बिघडू शकते. अनेकदा डॉक्टरांच्या भेटी, अतिरिक्त चाचण्या आणि कधी कधी हॉस्पिटलायजेशन होते. त्यामुळे आरोग्य सेवा खर्चात लक्षणीय वाढ होऊ शकते. हेल्थकेअर व्यावसायिक त्यांचे कौशल्य आणि तुमच्या वैद्यकीय गरजा समजून घेऊन औषधे लिहून देतात. म्हणून त्यांच्या सल्ल्यांवर विश्वास ठेवा आणि उपचार म्हणून निर्धारित केली गेलेली औषधे (कोर्स) पूर्ण करा,” असाही आग्रहपूर्वक सल्ला डॉ. चॅटर्जी यांनी दिला.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why stopping blood pressure drugs midway may harm you more know from expert pdb
First published on: 04-04-2024 at 14:26 IST