Viral Video : सोशल मीडियावर अनेक घरगुती टिप्स किंवा जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप फायदेशीर असतात. स्वयंपाक घरात काचेचे भांडे वापरायला अनेकांना आवडते पण अनेकदा काचेच्या भांड्यावर खूप लवकर चिकटपणा आणि पांढरटपणा येतो. त्यामुळे ही काचेची भांडी वापरावी असे वाटत नाही आणि काही वेळा आपण ही भांडी फेकून देतो पण आता टेन्शन घेऊ नका कारण एका सोप्या ट्रिकच्या मदतीने तुम्ही काचेच्या भांड्यावरील चिकटपणा आणि पांढरटपणा घालवू शकता. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही सोपी ट्रिक सांगितली आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये वॉशिंग पावडर आणि डिश लिक्विडच्या मदतीने काचेची भांडी कशी स्वच्छ करायची, याविषयी सांगितले आहे. ही ट्रिक अत्यंत सोपी असून याचा वापर करून तुम्ही तुमच्या घरची काचेची भांडी नव्यासारखी चमकवू शकता.

काचेच्या भांड्यावरील चिकटपणा कसा स्वच्छ करावा ?

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

  • एक मोठे पातेले घ्या. त्यात गरम पाणी टाका.
  • त्यानंतर त्यात वॉशिंग पावडर टाका आणि डिश वॉश लिक्विड टाका.
  • त्यात काचेचे भांडे सात ते दहा मिनिटे बुडवून ठेवा आणि त्यानंतर सॉफ्ट घासणीने ही भांडी घासा.
  • जेव्हा आपण काचेची भांडी सात ते दहा मिनिटे बुडवून ठेवतो त्यामुळे भांड्यावरील चिकटपणा लवकर बरा होतो.
  • भांडी स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला भांड्यावरील चिकटपणा तर दूर झालेला दिसेलच पण त्याच बरोबर पांढरटपणाही दूर होईल.
  • धुतल्यानंतर ही भांडी सुती कापडावर ठेवा आणि उन्हामध्ये चांगल्याने वाळवून घ्या.
  • त्यानंतर तुम्ही ही काचेची भांडी स्वयंपाकघरात वापरू शकता.

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. फक्त वॉशिंग पावडर आणि डिश वॉश लिक्विडचा वापर करून काचेची भांडी स्वच्छ करू शकता.

हेही वाचा : मुंबईत धुळीच्या वादळाचं तांडव; पेट्रोल पंपावर ५ सेकंदात कोसळलं लोखंडी होर्डिंग, लोकांच्या किंकाळ्या अन्…VIDEO व्हायरल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : हिंदू देवतांचे फोटो पायदळी? काँग्रेस कार्यकर्त्यांवर होतेय सडकून टीका; पण, Video चा भाजपाशी संबंध माहित्येय का?

prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “काचेच्या भांड्याचा पांढरटपणा या ट्रिकने काढा” प्राजक्त साळवे या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घरगुती अनेक टिप्स सांगताना दिसतात. त्यांच्या व्हिडीओवर अनेक युजर्स प्रतिक्रिया देताना दिसतात त्यांचे व्हिडीओ लाईक आणि शेअर करतात.