Parenting Tips: आजकाल विभक्त कुटुंबांची संख्या वाढत आहे. नोकरी किंवा कौंटुबिक वाद टाळण्यासाठी विभक्त कुटंबांची संख्या वाढते आहे. अशा कुटुंबामध्ये अनेक वेळा आई आणि बाबा दोघेही काम करत असतात पण मुलांना घरी एकटे राहावे लागते. या स्थितीत पालकांना त्यांची सतत काळजी वाटते. अशा परिस्थितीमध्ये पालकत्व अधिक आव्हानात्मक होते . मात्र, यासाठी थोडी काळजी घेऊन मुलांना तयार केल्यास खूप फायदा होऊ शकतो. जर तुमच्या मुलांना घरी एकटे ठेवण्याशिवाय काही पर्याय नसेल तर तुमच्या मुलांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही महत्वाच्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत आणि त्या गोष्टींची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे त्यामुळे मूल नेहमी सुरक्षित राहते. मुलांना एकटे सुरक्षित राहण्यास शिकवण्यासाठी पालकत्वाच्या टिप्स जाणून घेऊ या. मुलांना सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षिततेच्या सूचना दिल्या पाहिजेत.

काही नियम बनवा

जर तुम्हाला तुमच्या मुलाला घरात एकटे ठेवावे लागत असेलतर काही नियम बनवणे आवश्यक आहे आणि मुलाला नेहमी त्यांचे पालन करण्यास शिकवले तर चांगले होईल. घरी एकटे असताना त्यांना अनोळखी व्यक्ती किंवा आई-बाबा सोडून इतर कोणासाठी दार उघडू नये हे समजवा. त्यांना घरात येणाऱ्या अनोळखी लोकांशी जास्त संवाद साधण्यास मनाई करा. घरात सेफ्टी डोअर कसे लावायचे हे शिकवून ठेवा.

हेही वाचा – नेहमी आनंदी राहायचं असेल तर फक्त ‘या’ ५ सवयी सोडा! प्रत्येकजण विचारेल तुमच्या आनंदाचे कारण….

काही अडचण आल्यास काय करावे?

मुलांना घरी एकटे असताना जर कुठलीही अडचण आली तर कोणाला फोन करू शकता हे सांगात. जवळ राहणाऱ्या विश्वासू नातेवाईक किंवा शेजाऱ्यांचा मोबाईल क्रमांक त्यांना देऊन ठेवा. त्यांच्या मोबाइलमध्ये फास्ट डायलिंगवर त्यांच्या आणि आई-वडीलांचे नंबरवर सेव्ह करून ठेवा आणि त्याबद्दल मुलांना माहिती द्या.

हेही वाचा – नेहमी आनंदी राहायचं असेल तर फक्त ‘या’ ५ सवयी सोडा! प्रत्येकजण विचारेल तुमच्या आनंदाचे कारण….

खाणे-पिणे आणि मनोरंजनाची व्यवस्था करून ठेवा

मुलांसाठी अन्नपदार्थ घरी व्यवस्थित साठवून ठेवा. जेणेकरून त्यांना दूध गरम करण्यात किंवा सँडविच बनवण्यात किंवा मॅगी बनवण्यात कोणतीही अडचण येऊ नये. तुमच्या घरात इंडक्शन सारखे काहीतरी ठेवा जे गॅस बर्नरपेक्षा सुरक्षित आहे. यासह मुलांच्या मनोरंजनाचीही व्यवस्था असावी. मुलाला त्याच्या एकटेपणाच्या विचाराने पुन्हा पुन्हा त्रास होऊ शकतो.