Pillow and sleeping : प्रत्येकाची झोपण्याची पद्धत वेगळी असते. कोणाला पोटावर झोपण्याची सवय असते, कोणाला एका कुशीवर झोपण्याची सवय असते तर कोणाला पायामध्ये उशी ठेवून झोपण्याची सवय असते. अनेकांना पायांमध्ये उशी ठेवल्याशिवाय झोप येत नाही. पण पायांमध्ये उशी ठेवून झोपावे की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. सहसा महिलांना पायामध्ये उशी ठेवून झोपण्याचा सल्ला दिला जातो.

महिलांना दैनदिन आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. घर आणि ऑफिस दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. त्यामुळे त्यांचे शरीर खूप थकते, त्यामुळे त्यांना तणाव, पाठदुखी आणि निद्रानाश या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत महिलांनी रात्री झोपताना पायांमध्ये उशी ठेवावी. यातून त्यांना अनेक फायदे मिळतात, चला तर मग जाणून घेऊया.

पायांमध्ये उशी ठेवून झोपल्यास मिळतील हे फायदे


१) महिलांनी पायांमध्ये उशी ठेवून झोपल्यास पाठदुखीपासून आराम मिळतो. हे मासिक पाळी दरम्यान आराम देते. यामुळे क्रॅम्प्सपासून आराम मिळतो. यामुळे चांगली झोप येते.

२) गरोदर महिलेने पायांमध्ये उशी ठेवून झोपण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे पोटातील नसांवर दबाव निर्माण होत नाही. अशा परिस्थितीत, अशा प्रकारे झोपणे चांगले आहे.

हेही वाचा- पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी ‘हे’ तेल वापरून पाहा, तेलात फक्त मेथी दाणे टाकून करा केसांची मालिश

३) रात्री पायांमध्ये उशी ठेवून झोपल्याने रक्ताभिसरण सुधारते. यामुळे मणक्याचे संरेखन (Alignment) सुधारते. यामुळे कंबरेच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

हेही वाचा – Morning Habits For Success: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बदला तुमच्या सकाळी उठल्यानंतरच्या या सवयी

४) अशा प्रकारे झोपल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो. यामुळे दुखण्यापासूनही आराम मिळतो. यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ताही सुधारते. सकाळी तुम्हाला फ्रेश वाटते.

(टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)