घटत्या लोकसंख्येच्या आव्हानाला तोंड देत असलेल्या जपानमध्ये लग्नाच्या घटत्या टक्केवारीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान जपानमध्ये सध्या ‘फ्रेंडशिफ मॅरेज’(Friendship Marriage) हा नवीन रिलेशनशिप ट्रेंड निर्माण होत आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) च्या अहवालानुसार, जपानमधील तरुणांची वाढती संख्या प्रेम किंवा लैंगिक संबंधांशिवाय नवीन प्रकारचे वैवाहिक संबंध निवडत आहे. अहवालात या ट्रेंडला ‘फ्रेंडशिफ मॅरेज’ असे नाव देण्यात आले आहे.

अहवालानुसार, रिलेशनशिपचा कल समान मूल्ये आणि आवडींवर आधारित आहे आणि लोक याकडे पारंपारिक विवाहांसाठी पर्याय म्हणून पाहत आहेत.

हेही वाचा – केळीची साल करू शकते तुमची बाग हिरवीगार! खत म्हणून का करावा वापर? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

फ्रेंडशिफ मॅरेज म्हणजे काय?

मिळालेल्या माहितीवुसार फ्रेंडशिफ मॅरेजची व्याख्या “समान आवड आणि मूल्यांवर आधारित सहवासाचे नाते” अशी केली आहे. रिलेशनशिप ट्रेंडनुसार, लोक ज्या व्यक्तीवर प्रेम करतात किंवा रोमँटिक नात्यात आहेत त्यांच्याशी लग्न करत नाहीत

या ट्रेंडनुसार, नात्यातील जोडीदार कायदेशीर विवाह करू शकतात आणि पती-पत्नी म्हणून एकत्र राहू शकतात. मैत्री विवाहातील लोकांना एकमेकांच्या सहमतीने इतर लोकांशी संबंध ठेवू शकतात. शिवाय, ते artificial insemination पद्धतीने मुले जन्माला घालण्याचा निर्णय घेऊ शकतात.

फ्रेंडशिफ मॅरेज हे समान आवडी असलेला रूममेट शोधण्यासारखे आहे,” SCMP ने एका व्यक्तीचा हवाला दिला जो तीन वर्षांपासून फ्रेंडशिफ मॅरेजमध्ये होता.

अशाच रिलेशनशिपमध्ये दुसऱ्या व्यक्तीने फ्रेंडशिफ मॅरेजत असण्याचा तिचा अनुभव शेअर केला आणि सांगितले की ती या नात्यामध्ये ‘एखाद्याच्या गर्लफ्रेंड म्हणून योग्य’ नसल्यास ती ‘चांगली मैत्रीण’ राहू शकते. तिने असेही सांगितले की, तिला समान आवडी आणि निवडी असलेल्या व्यक्तीसह राहायचे आहे.

एससीएमपी अहवालात असे दिसून आले आहे की,”हा कल अलैंगिक व्यक्ती आणि समलैंगिकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. जपानमध्ये समलिंगी विवाह कायदेशीर नसल्यामुळे देशात हा पर्यायी मार्ग स्वीकारणाऱ्या समलैंगिकांसाठी फ्रेंडशिफ मॅरेजकडे पाहिले असल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.

हेही वाचा – तापमानाचा वाढला पारा, लाडक्या पाळीव प्राण्यांचे आरोग्य सांभाळा! उष्णतेच्या लाटेमुळे कुत्रा-मांजरही त्रासले, अशी घ्या त्यांची काळजी?

पालकांच्या समाधानासाठी तरुण -तरुणी करतात फ्रेंडशिफ मॅरेज

जे लोक लग्न करण्यास इच्छुक नाहीत परंतु समाजासमोर “स्थिर आणि समजुतदार” व्यक्ती म्हणून प्रतिमा तयार करण्यासाठी किंवा त्यांच्या पालकांना खूश करण्यासाठी फ्रेंडशिफ मॅरेज करत आहेत. अशा लोकांसाठी फ्रेंडशिफ मॅरेज हा एक सुटका ठरू शकतो, असे एससीएमपी वृत्त अहवालात अधोरेखित केले आहे. त्यात असेही म्हटले आहे की,”७० हून अधिक जपानमध्ये एकट्या स्त्रीला मातृत्व स्वीकारणे अजूनही अवघड वाटत असल्याने ७० % फ्रेंडशिफ मॅरेज हे मुलं सांभळण्यासाठी जोडीदार हवा असल्याने केले जाते.