How To Disinfect Soil In Plants Video: आपल्या घरातील बाग फुलांनी बहरून जावी, सकाळी उठल्यावर आपल्याला छान हिरवळ दिसावी अशी इच्छा अनेकांची असते. त्यासाठी मेहनत घेऊन अनेकजण छान रोपं, साजेश्या कुंड्या, सजावटीला शोभेच्या लाईट्स घेऊन येतात. पण रोपांची निगा राखणे हे सुंदर बागेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर सुरुवातीला तरी छान सुंदर रोपांनी बाग बहरून जाईल पण नंतर लगेचच पाने सुकायला आणि कुंड्या ओसाड व्हायला सुरुवात होऊ शकते. रोपांची निगा राखणे म्हणजे काय तर तण उपटून टाकणे, वेळोवेळी खत, पाणी व सूर्यप्रकाश पुरवणे, तसेच कीटकांमुळे किंवा बुरशीमुळे मातीला संसर्ग होऊ नये याचीही काळजी घेणे. तुळस किंवा भाज्यांच्या रोपांच्या कुंडीतील मातीमध्ये केमिकलयुक्त खतांचा वापर करणे हे घातक ठरू शकते त्याऐवजी आपल्याला वापरता येईल असं नैसर्गिक खत आपण आज पाहणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in