पुणे : गाणपत्य संप्रदायामध्ये कार्तिक शुद्ध चतुर्थीनिमित्त श्री उमांगमलज जन्मोत्सवात तब्बल ११०० नारळांचा महानैवेद्य दाखवून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मंगळवारी पूजा बांधण्यात आली. ‘श्रीफला’मध्ये सजलेल्या गणरायाचे रूप डोळ्यांमध्ये साठवून घेण्याबरोबरच भाविकांनी मोबाईलमध्ये गजानानाचे छायाचित्र टिपले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नारळांची आरास करण्यात आली.  पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सूक्तपठण झाले. रसिक कुलकर्णी आणि सानिका कुलकर्णी यांनी स्वरपूजा बांधली.

हेही वाचा: पुणे: जिल्ह्यात नऊ ठिकाणी बंडखोरी; महायुती आणि महाविकास आघाडीसमोर अनुक्रमे पाच व चार ठिकाणी आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, ‘देवी पार्वतीने अंगावरच्या मळापासून एक पुतळा बनवला. त्याला जिवंत केले. पुढे त्याचे आणि शंकरांचे युद्ध झाले. भगवान शंकरांनी त्या मुलाचे मस्तक उडविले. देवी पार्वतीच्या संतापाला शांत करण्यासाठी शेवटी त्या बालकाच्या धडावर भगवान श्री विष्णूंनी आणलेले गज मस्तक बसविण्यात आले आणि त्यालाच श्री गजानन असे म्हटले आहे. ही श्री गणेश जन्माची कथा आपण नेहमी ऐकतो ती या अवताराची कथा आहे. या अवतारात उमांगमलज हे गणेशाचे नाव आहे. आपली बुद्धी हीच पार्वती देवी आहे. तिच्यावर चढलेला अहंकार आणि ममत्वाचा थर हाच मळ आहे. हा अहंकार आणि ममत्व दूर झाले की ज्या मोरयांची प्राप्ती होते त्यांना उमांगमलज असे म्हणतात.’