scorecardresearch

Premium

World Heart Day 2023: तणावाचा हृदयाच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? तणाव कमी करण्याचे सोपे मार्ग, जाणून घ्या

आजच्या धावपळीच्या जगात जेव्हा आपण आपल्या कामाच्या ठिकाणी, घरामध्ये, शाळा इत्यादींमध्ये सतत तणावपूर्ण परिस्थितीला तोंड देत असतो, तेव्हा तणाव सातत्याने असतोच, ज्यामुळे आपल्याला “क्रोनिक स्ट्रेस डिसऑर्डर” विकसित होऊ शकतो.

World Heart Day 2023 How stress affects heart health and 7 ways to reduce stress
तणावाचा हृदयाच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? (प्रातिनिधीक फोटो – सौजन्य – फ्रिपीक)

“तणावांमुळे हृदयाचे आजार होतात!” हे वाक्य जरी आपण डॉक्टर, मित्र आणि कुटुंबीयांकडून दररोज ऐकले असेल. पण हे जैविक आणि वैद्यकीय संशोधनावर आधारावर सांगितले जाते. आहे. तणाव हा चिंता आणि भितीदायक स्थितीमध्ये आपल्या शरिराकडून मिळणारी प्रतिक्रिया आहे. वाघ पाठीमागे लागल्यासारख्या परिस्थितीमध्ये, जेव्हा आपल्या समोर आलेल्या परिस्थतीचा सामना करायचा असतो अशा स्थितीमध्ये आपले शरीर त्वरित प्रतिक्रिया देते. यालाच आपण आल्पकालीन ताण येतो.

भयावह परिस्थिती संपल्यानंतर शरीर आपोआप सामान्य स्थितीत येते. पण आल्पकालीन ताण जात नसेल तर काय करावे?तणावपूर्ण परिस्थितीत आपल्या शरीरात दोन हार्मोन्स कॉर्टिसॉल आणि अॅड्रेनालाईन सोडले जातात. कॉर्टिसॉल तणाव परिस्थितीत साखरेला उर्जेचा स्रोत म्हणून सोडण्यात मदत करते, तर अ‍ॅड्रेनालाईन शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्त प्रवाहाला प्राधान्य देण्यासाठी मदत करते. जसे की पायांमधील स्नायू, इतर रक्तवाहिन्या आकुंचन पावते आणि हृदय गती वाढवते ज्यामुळे अतिरिक्त ऑक्सिजनयुक्त रक्त तयार होते आणि ते स्नायूंपर्यंत पोहोचू शकते. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे उच्च रक्तदाब होतो.

आजच्या धावपळीच्या जगात जेव्हा आपण आपल्या कामाच्या ठिकाणी, घरामध्ये, शाळा इत्यादींमध्ये सतत तणावपूर्ण परिस्थितीला तोंड देत असतो, तेव्हा तणाव सातत्याने असतोच, ज्यामुळे आपल्याला “क्रोनिक स्ट्रेस डिसऑर्डर” विकसित होऊ शकतो. वर सांगितल्याप्रमाणे, यामुळे सतत उच्च रक्तदाब, हृदय गती वाढणे, रक्तवाहिन्यांचे आकुंचन इत्यादी कारणे अनेक हृदयविकार होऊ शकतात. आता आपल्याला परिस्थिती माहित आहे त्यामुळे तणाव टाळण्यासाठी काय केले जाऊ शकते? याचा विचार केला पाहिजे. “क्रोनिक स्ट्रेस डिसऑर्डरपासून स्वतःला वाचवण्यासाठी येथे काही सोप्या टिप्स दिल्या आहेत त्याचे पालन करा:

try these five amazing use of eggshells tips
आज अंड्याचा नव्हे, तर त्याच्या ‘कवचांचा’ फंडा पाहू! कचऱ्यात फेकून देण्याआधी या पाच टिप्स पाहा
Benefits of cuddling for health
हृदयाच्या आरोग्यापासून ते उत्तम झोपेपर्यंत ‘Cuddling’, ‘मिठी मारणे’ ठरते फायदेशीर! काय सांगतात डॉक्टर पाहा…
rbi governor shaktikanta das talk about main challenges in inflation fight
महागाई नियंत्रणाच्या यत्नांत अनेक आव्हाने – दास
Exercising 150 mins week to prevent heart attacks Study says it may not be enough if you have sugary health drinks
दर आठवड्याला व्यायाम करता? पण साखरयुक्त पेय घेऊन सर्व मेहनत वाया घालवता; संशोधनाबाबत काय सांगतात डॉक्टर….

व्यायाम आणि योगासने

हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम आणि योगासने किती महत्त्वाची आहेत. व्यायाम आणि योग दोन्ही आपल्या शरीरात एंडोर्फिन हार्मोन्स सोडतात ज्याला मूड लिफ्टर हार्मोन्स देखील म्हणतात. याव्यतिरिक्त, नियमित व्यायाम केल्याने आपल्याला स्वतःबद्दल चांगले वाटेल, आपला आत्मविश्वास वाढेल आणि त्यामुळे तणाव कमी होईल.

हेही वाचा – World Heart Day 2023: जागतिक हृदय दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि इतिहास

खोल श्वास घ्या

जेव्हा तुम्हाला तणावाचा सामना करावा लागतो तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. तुमच्या रक्तवाहिन्यांमधून आणि तुमच्या मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळेल आणि ताण कमी होईल. तणावपूर्ण कामाच्या वातावरणात, तीव्र तणावाचा सतत त्रास टाळण्यासाठी हे विशेषतः उपयुक्त आहे.

निरोगी आहार

आता आपल्या आहारात फळे आणि भाज्या समाविष्ट करणे आणि जंक फूड टाळणे हे निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे. निरोगी अन्न पर्याय रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात. फायबर आणि प्रोबायोटिक्स नसलेला आहार आतडे खराब करू शकतो, ज्यामुळे मूड खराब होतो आणि तणाव वाढतो.

अति कॉफीचे सेवन टाळणे

जास्त कॉफी तनाव निर्माण करते असे म्हटले जाते. म्हणून, ज्यांना तनाव आणि अतिविचार होण्याची शक्यता आहे त्यांनी दिवसातून एक किंवा दोन नियमित कपपेक्षा जास्त घेऊ नये.

मित्र-मैत्रिणींबरोबर संवाद साधा

या जलद गतीने तणाव निर्माण करणाऱ्या जीवनात, चांगले सामाजिक संबंध राखण्यास विसरू नका. जेव्हा तुम्ही कामाच्या ओझ्याखाली दाबले गेला किंवा कमी वाटत असाल, तेव्हा तुमच्या मित्रांशी आणि कुटुंबातील सदस्यांशी बोला. तुमचा ताण कमी होईल.

शिस्त लावा

तुमचे ऑफिस तुमची खोली आणि तुमचे घर व्यवस्थित करा. बेशिस्तपणा आपल्याला गोंधळात टाकतो, ज्यामुळे आपल्याला एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ लागतो, त्यामुळे तणाव निर्माण होतो.

हेही वाचा : अपुऱ्या झोपेमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांचा धोका वाढतो का?

डॉक्टरांची मदत घ्या

तणाव जास्त असल्यास थेरपिस्टकडे जाण्यास कधीही संकोच करू नका. तुमची प्रकृती बिघडू देण्यापेक्षा डॉक्टरांचे समुपदेशन आणि मार्गदर्शन चांगले आहे.

आजच्या वेगवान जगात तणाव व्यवस्थापनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World heart day 2023 how stress affects heart health and 7 ways to reduce stress snk

First published on: 28-09-2023 at 15:47 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×