28 September 2020

News Flash

माथेरानमध्ये 800 फूट खोल दरीत महिला कोसळली

या पॉइंटवर गेले असता त्यांना दगडाची ठेच लागली आणि...

(सांकेतिक छायाचित्र)

माथेरानमध्ये 800 फूट खोल दरीत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. संगीता मिश्रा असं मृत महिलेचं नाव आहे.

संगीता ह्या मुंबईहून पती आणि दोन मुलांसोबत माथेरान येथे फिरण्यासाठी आल्या होत्या. हे कुटुंब माथेरान येथील बेल्व्हीडीयर पॉईंट येथे गेले. या पॉइंटवर गेले असता त्यांना दगडाची ठेच लागली आणि त्यांचा तोल गेल्याने त्या आठशे फूट दरीत कोसळल्याची माहिती आहे. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे पती व लहान दोन मुली व एक मित्र होता.

या अपघातानंतर स्थानिक पोलीस आणि माथेरानमधील सह्याद्री बचाव पथकाने खोल दरीत उतरुन तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतहेद बाहेर काढला. या घटनेमुळे माथेरानमधील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 10:53 am

Web Title: matheran tourists women dead after fallen from belvidear point
Next Stories
1 नक्षलवादी काही बाहेरचे नाहीत, मी मध्यस्थीसाठी तयार – अण्णा हजारे
2 राज यांच्या सभांचा खर्च मागण्याचा अधिकार नाही – शरद पवार
3 ‘नीट’परीक्षेसाठी कडक नियम नाहकच
Just Now!
X