महाराष्ट्रात ३६५ दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी राज ठाकरे यांचे बुधवारी औरंगाबादेत आगमन झालं. आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवजयंती साजरी केली. यावेळी बोलताना त्यांनी महाराजांची जयंती एक सण तो त्याप्रमाणेच साजरा झाला पाहिजे असं सांगितलं.
शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार या वादावर बोलताना राज ठाकरेंनी सांगितलं की, “मी काही वर्षांपूर्वी जयंत साळगावकर यांच्याकडे गेलो होतो. त्यांना मी तेव्हा शिवजयंती तारखेनुसा साजरी करायची की तिथीनुसार असं विचारलं होतं. यावर त्यांनी सांगितलं की, ३६५ दिवस करायची. पण तिथीनुसार का याबद्दल सांगायचं झालं तर, आपण जे वर्षभर सण साजरे करतो ते तिथीनुसार करतो. कोणताच सण तारखेनुसार साजरा केला जात नाही. महाराजांची जयंती आपल्यासाठी एक सण आहे. त्यामुळे तो एका सणाप्रमाणेच साजरा झाला पाहिजे”.
आणखी वाचा- करोनाचा उगाच बाऊ का केला जात आहे?; राज यांचा ठाकरे सरकारला सवाल
पुढे बोलताना राज ठाकरेंनी हा उत्सव दिमाखात साजरा कराल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली. तसंच शोभायात्राही उत्साहात पार पडेल अशी आशा असल्याचं म्हणाले. शिवजयंती साजरी होत असताना गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. करोनासंबंधी बोलताना राज ठाकरेंनी आधीच या देशात रोगराई आहे त्यात अजून एक वाढला तर काय फरक पडतो असं म्हटलं. काळजी घेतली पाहिजे यात काही वाद नाही. महाराष्ट्रात कोणाला लागण होता कामा नये अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 12, 2020 12:19 pm