News Flash

भुजबळ समर्थक कैलास मुदलियारला कोठडी

गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या कैलास मुदलियारने राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपली प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न केला.

येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा निकटवर्तीय कैलास मुदलियारला पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक केली. नाशिक रोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या कैलास मुदलियारने राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपली प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न केला. पक्ष आणि स्वत:च्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नाशिक रोड परिसरासह अन्य ठिकाणी त्याने काही महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले. २०१२ मध्ये आर्टिलरी सेंटर येथे एकावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यात शाम खोले, नितीन अहिरे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी योगेश चव्हाण यांच्या तक्रारीनुसार मुदलियारसह अर्जुन पिवाल, कॅप्टन कपू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मुदलियारला पोलिसांनी अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची रवानगी नाशिक रोड कारागृहात करण्यात आली. दरम्यान, मुदलियारविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत प्राणघातक हल्ले, खंडणी, मारहाण, शस्त्रास्त्रे बाळगणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 12:02 am

Web Title: police arrested to chhagan bhujbal friend kailash mudaliar in murder case
Next Stories
1 चंद्रकांत पाटलांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा, अजित पवारांची मागणी
2 VIDEO : मुंबई-गोवा महामार्गावरील पूल कोसळला
3 डी. वाय. पाटील संस्थेवरील छाप्यात सापडले ४० किलो सोने आणि ३० कोटींची रक्कम
Just Now!
X