News Flash

राहुल गांधी यांची लातूरमध्ये आज सभा

काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांची जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा होणार असून या सभेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव

| April 14, 2014 01:53 am

काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांची जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा होणार असून या सभेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हेही उपस्थित राहणार आहेत.
नरेंद्र मोदी यांची भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना उत्तर देण्यासाठी राहुल गांधी यांच्या प्रचार सभेचे आयोजन केले आहे. ज्या मैदानावर मोदी यांची सभा झाली, त्याच मैदानावर राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करून मोदी यांच्या सभेपेक्षा अधिक संख्या उपस्थित राहावी यासाठी काँग्रेसची यंत्रणा कामाला लागली आहे. सोमवारी, १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता सभा होणार आहे. प्रायमरीजची कल्पना राहुल गांधी यांनी देशातील १५ मतदारसंघासाठी वापरली. लातूर मतदारसंघाचा त्यात समावेश असल्यामुळे त्यांची सभा लातूरमध्ये होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 1:53 am

Web Title: rahul gandhi today meeting in latur
टॅग : Rahul Gandhi
Next Stories
1 मोदी भांडवलदारांचे हस्तक- निलोत्पल बसू
2 औरंगाबादच्या २२ उमेदवारांना नोटिसा!
3 कर्मचा-यांना चिंता जेवणाच्या दर्जाची
Just Now!
X