05 March 2021

News Flash

राज ठाकरेंच्या वाहनताफ्यावर किरकोळ दगडफेक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. दरम्यान आज(मंगळवार) भगवानगड येथून दर्शन घेऊन परत येत असतांना भिंगार गावाजवळ राज ठाकरेंच्या वाहनताफ्यांवर किरकोळ दगडफेकीचा

| February 26, 2013 11:10 am

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. दरम्यान आज(मंगळवार) भगवानगड येथून दर्शन घेऊन परत येत असतांना भिंगार गावाजवळ राज ठाकरेंच्या वाहनताफ्यांवर किरकोळ दगडफेकीचा प्रकार घडला. मनसे कार्यकर्त्यांनी ही दगडफेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा आरोप केला आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून काळ्याफिती दाखवून राज ठाकरे यांचा निषेद दर्शवला दगडफेक केली नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्ते आमने-सामने आल्याने बाचाबाचीचा प्रकार घडला आणि पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्याचे वृत्त आहे. सदर घटनेमुळे अहमदनगर परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2013 11:10 am

Web Title: stone attack on raj thackrey vans
Next Stories
1 वीजदर व सवलतींच्या फेरविचाराची वेळ – मुख्यमंत्री
2 शौचालय असलेल्या खास बसेस पर्यटन महामंडळाच्या ताफ्यात!
3 रेल्वे अर्थसंकल्प : कोकण रेल्वेला प्रतीक्षा प्रलंबित मागण्या पूर्ण होण्याची!
Just Now!
X