महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४ हजार २७९ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत एकूण १८ लाख ३२ हजार ८२५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९४.६९ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ३ हजार ५२४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर मागील २४ तासांमध्ये राज्यात ५९ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २८ लाख २३ हजार ८३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ३५ हजार ६५६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ६९ हजार ३४८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार ३१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ५२ हजार ८४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

आज राज्यात ३ हजार २५४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोग्रस्तांची संख्या १९ लाख ३५ हजार ६५६ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या ५९ मृत्यूंपैकी २६ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर उर्वरित १४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १९ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. दरम्यान आजपर्यंत महाराष्ट्रात करोनामुळे एकूण ४९ हजार ५८० जणांचा मृत्यू झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4279 corona patients discharged in maharashtra in last 24 hours scj
Show comments