अलिबाग- रोहा मार्गावरील मल्याण येथील घटना

अलिबाग रोहा मार्गावर मल्याण फाटा येथे सहा आसनी रिक्षा पलटी होऊन सात महिला गंभीर जखमी झाल्या. तर अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले. जखमीवर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खानाव येथील सानिका गायकर हिच्या वडिलांचे दहावे आंदोशी येथे गुरुवारी होणार होते. त्यासाठी  खानाव येथून (एमएच ०६/ जे ६८३) या सिताराचे चालक नंदकुमार पाटील हे महिलांना घेऊन आंदोशी कडे निघाले होते. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मल्याण फाटा येथे सितारा आला असता खड्डा चुकविताना चालकाचे नियंत्रण सुटून सितारा पलटी झाला. या अपघातात दहा  महिला ह्य जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच खानाव ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना तातडीने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

rickshaw Driver put Puneri Pati in rickshaw for couples see Viral Photo
“…अथवा पोकळ बांबूचे”, रिक्षावाल्याने पुणेरी पाटी लावून जोडप्यांना दिली ताकीद, पाहा Viral Photo
kalyan school student injured marathi news
कल्याणमध्ये दारूची बाटली डोक्यात पडल्याने विद्यार्थी गंभीर जखमी
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
mumbai, J J Hospital, ART Center, HIV AIDS Treatment, Celebrate 20 Years, 43 thousand, Patients Treated,
जे. जे. रुग्णालयात ४३ हजार एचआयव्ही रुग्णांवर उपचार, पहिल्या एआरटी केंद्राला २० वर्षे पूर्ण

भारती गायकर, वंदना गायकर, जयश्री गायकर, शारदा गायकर, निकिता गायकर, सानिका गायकर,(गरोदर) सुनंदा गायकर (सर्व राहणार मूळ खानाव ) अशी या अपघातात गंभीर रित्साया जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. तर अन्य तीन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.  या अपघातामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूकीचा मुद्दा चव्हाटय़ावर आला आहे.

दरम्यान अलिबाग रोहा रस्ता खड्डेमय झाला आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याला पडलेले खड्डेही भरण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेकदा या रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत असल्याचा आरोप काँग्रेस नेते अनंत गोंधळी यांनी केला आहे.