छत्रपती संभाजीनगर : वाळूजनजीकच्या बकवालनगरात आशा कार्यकर्तीने चालविलेले गर्भपात प्रकरण गंगापूरच्या आरोग्य विभागाने जानेवारी महिन्यात उघडकीस आणले होते. यातील मुख्य आरोपी महिला कार्यकर्ती पसार होती. तिला पैठण तालुक्यातील रहाटगावातून अटक करण्यात आली असल्याची माहिती वाळूज पोलिसांनी दिली. अटक केलेल्या महिलेचे नाव वैशाली रवींद्र जाधव असे आहे. वैशाली जाधवने दिलेल्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी शुक्रवारी सुनील लहुराव मेघारे, गणेश सोनाजी सवंडकर यांना अटक करण्यात आली आहे. या दोघाकडून गर्भपात करणाऱ्या गोळयांची कीट जप्त करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी गावपातळीवर आरोग्य विभागाने वैशाली जाधव या आशा कार्यकर्तीची नियुक्ती केली होती. मदर केअर बिल्डींगमधून सदर महिला सेवा देण्याचे काम करायची. यात केंद्रात गर्भलिंग निदान चाचणी करून महिलाचे गर्भपात केले जात असल्याची तक्रार काहींनी हेल्पलाईनव्दारे थेट पुणे येथील सबंधित विभागाकडे केली होती.

हेही वाचा…सिल्लोडजवळील शेतात अर्भकांचे अवशेष आढळले; छत्रपती संभाजीनगरमधील अवैध गर्भपात प्रकरणाचे धागेदोरे

तक्रार प्राप्त होताच गंगापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश पवार यांच्या पथकातील डॉ. सुदाम लगास यांनी ३० जानेवारीला बकवालनगर पोलिसासह गाठले होते. पथकाने याविषयीची चौकशी करून वाळूज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati sambhajinagar asha worker arrested in illegal abortion case two others detained psg