सोलापूर : सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे वृद्ध दाम्पत्याच्या निर्घृण हत्येच छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे. हे हत्याकांड पोटच्या मुलानेच तेसुद्ध रेशनकार्ड न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. भीमराव गणपती कुंभार (वय ७०) आणि त्यांच्या पत्नी सुसाबाई ऊर्फ सुशीला कुंभार (वय ६५) यांची राहत्या घरात गेल्या २९ फेब्रुवारी रोजी रात्री हत्या झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मविआचे जागा वाटप, फक्त चार जागांवर… बाळासाहेब थोरात यांचा विश्वास

हेही वाचा – मराठा आरक्षण आंदोलनावर एकनाथ शिंदेसुद्धा फडणवीसांचीच भाषा बोलतात, मनोज जरांगेंचा आरोप

या गुन्ह्याचा तपास करताना कुंभार यांचा विभक्त राहणारा मुलगा समाधान कुंभार (वय ४२) याच्या दिशेने संशयाची सुई सरकली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. समाधान हा आई-वडिलांकडे गेल्या दहा दिवसांपासून रेशनकार्ड मागत होता. २९ फेब्रुवारी रोजी रात्री गावात शिवजयंती उत्सवाची मिरवणूक सुरू असताना त्याने आई-वडिलांच्या घरी जाऊन रेशनकार्ड मागितले. आई सुशीला हिने रेशनकार्ड सापडत नसल्याचे सांगितले तेव्हा समाधान याने घर धुंडाळू लागला असता आईने विरोध केला. त्याचा राग मनात धरून समाधान याने आईचा गळा दाबून नंतर नायलॉनच्या दोरीने गळफास देऊन खून केला. त्यानंतर वडिलांचाही खून केला, असे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. एस. खणदळे यांनी सांगितले. दरम्यान, समाधान कुंभार यास ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child murder old parents for the ration card ssb