Mumbai Maharashtra News Today: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानस्थित दहशवाद्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे चोख प्रत्युत्तर दिले आहे. बुधवारी मध्यरात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर हे भारतीय लष्कराने ही कारवाई केली आहे.

भारतीय लष्कराच्या या कारवाईनंतर महाराष्ट्रासह देशभरातून समाधन व्यक्त केले जात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील पर्यटकांच्या कुटुंबियांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. यासह राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतीक क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.

Live Updates

Mumbai-Pune News Live Today 07 May 2025 : महाराष्ट्र लाईव्ह अपडेट्स ७ मे २०२५

19:24 (IST) 7 May 2025

Operation Sindoor : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “राज ठाकरे ऑपरेशन सिंदूरबाबत काय म्हणाले त्याला फारसं महत्त्व नाही, देश..”

India Pakistan War Tensions : २२ एप्रिलच्या दिवशी काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना प्राण गमावावे लागले. त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोळ्या आणि अश्रू या सगळ्यांनी काश्मीरचं वातावरण एकदम दुःखदायक झालं. या सगळ्या घटनेचे पडसाद जगभरात उमटले. जगभरातून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. भ्याड हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचं समजलं. दरम्यान ६ मे च्या रात्री उशिरा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करुन भारताने उत्तर दिलं. मात्र राज ठाकरे यांनी याबाबत नकारात्मक म्हणता येईल अशी प्रतिक्रिया दिली. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं आहे.

सविस्तर वाचा…

18:20 (IST) 7 May 2025

Operation Sindoor : “हा नवीन भारत, हे पुन्हा एकदा दाखवून दिलं”, मुख्यमंत्री फडणवीसांची ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया; म्हणाले, “संपूर्ण जग…”

Operation Sindoor : भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर विविध क्षेत्रामधून प्रतिक्रिया समोर येत आहेत. …सविस्तर वाचा
18:05 (IST) 7 May 2025

पावसामुळे २४ हेक्टरवरील आंबाबागांचे नुकसान ! भिवंडीत सर्वाधिक नुकसान

मे महिन्याच्या तीव्र उन्हाचा तडाखा सोसत असताना मंगळवारी रात्री अचानक जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. …अधिक वाचा
17:05 (IST) 7 May 2025

Operation Sindoor : उद्धव ठाकरेंची ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया, “पाकिस्तानचे भारतातील स्लीपर सेल्स….”

“भारतीय सैन्याने पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये २६ मायभगिनींचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करुन सैन्याने बदला घेतला. पाकिस्तानचे भारतातील स्लीपर सेल्स उद्ध्वस्त करुन दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणं गरजेचं आहे. भारतीय सैन्य सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम आहे. ऑपरेशन सिंदूरने ते दाखवून दिलं. भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

15:52 (IST) 7 May 2025

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मॉक ड्रिल

ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) च्या प्लॅटफॉर्म ७ आणि ८ वर मॉक ड्रिल केले पार पडले. गृह मंत्रालयाने आज देशभरात मॉक ड्रिलचे आदेश दिले आहेत.

15:39 (IST) 7 May 2025

भारताची खरी ओळख दाखवून देणारा क्षण: रोहित पवार

राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनीही भारतीय लष्करातील स्त्रीशक्तीची ताकदीवर भाष्य केले आहे. एका एक्स पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की, “संपूर्ण जगाला ऑपरेशन सिंदूरची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली. हा क्षण खूप बोलका असून भारतीय स्त्रीशक्तीची ताकद, भारताची खरी ओळख दाखवून देणारा आहे. तिन्ही संरक्षण दलांत महिलांना सक्षम संधी देणारा १९९१ मध्ये घेतला गेलेला ऐतिहासिक निर्णय खऱ्या अर्थाने दूरदृष्टीचा म्हणावा लागेल!”

14:42 (IST) 7 May 2025

Operation Sindoor Updates In Marathi: “भारत सहन करणार नाही, हे सैन्याने दाखवून दिले”, ऑपरेशन सिंदूरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

भारतीय हवाई दलाने मध्यरात्री एअर स्ट्राईक करत पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. लष्कराच्या या कारावाईचे देशभरातून कौतुक केले जात आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “भारतीय सैन्य दलाचे हार्दिक अभिनंदन! पाकिस्तान येथील दहशतवाद्यांचे ९ अड्डे अचूकपणे एयर स्ट्राइक करून पूर्णतः उद्ध्वस्त केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सर्व देशवासीयांचे मन:पूर्वक अभिनंदन! ऑपरेशन सिंदुर हे नावच पुरेसे बोलके आहे.

14:34 (IST) 7 May 2025

Maharashtra Live Updates: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबत न्यायमूर्ती दिलीप भोसले समितीचा अहवाल सादर

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबत न्यायमूर्ती दिलीप भोसले समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो सीलबंद अहवाल गृह विभागाला सोपवला. चौकशीसोबतच काही उपाययोजना सुद्धा सरकारला सुचविण्यात आल्या आहेत, असे समितीने सांगितले.

14:11 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: ही लढाई दहशतवादाविरुद्ध : सुप्रिया सुळे

भारतीय लष्कराने पाकिस्तानात केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की, “मला भारतीय सैन्याचा खूप अभिमान आहे, त्यांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. ही लढाई कोणत्याही देशाविरुद्ध किंवा कोणत्याही नागरिकांविरुद्ध नाही, तर ती दहशतवादाविरुद्ध आहे.”

13:38 (IST) 7 May 2025

वादळीवाऱ्यामुळे मच्छीमारांच्या बोटी किनाऱ्यावरच, मासेमारीच्या अखेरच्या महिन्यात बोटी बंद ठेवण्याची वेळ

अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मासेमारी करण्यास बाधा येत असून मच्छिमार पूर्ण क्षमतेने मासेमारी करू शकत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. …सविस्तर बातमी
13:17 (IST) 7 May 2025

पालघर : क्ष किरण विभाग बंदच्या तक्रारीवर ग्रामीण रुग्णालयाचे दोन वर्षानंतर उत्तर; रुग्ण आला नसून विभाग बंद नसल्याचा रुग्णालयाचा दावा

एप्रिल २०२३ मध्ये ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रुग्णाला एक्स-रे काढण्यास सांगितल्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील संबंधित विभाग बंद असल्याने रुग्णाने क्ष किरण विभागाबाबत तक्रार केली होती. …सविस्तर बातमी
13:09 (IST) 7 May 2025

Operation Sindoor News Updates In: “मला वाटते की हा फक्त एक ट्रेलर आहे”, एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आपल्या भारतीय सशस्त्र दलांनी हवाई हल्ल्याद्वारे पाकिस्तानला जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिले आहे. मला वाटते की हा फक्त एक ट्रेलर आहे, पाकिस्तान आता पुढे काय होते ते पाहेल. आपला देश पाकिस्तानमधील दहशतवादाची मुळे पूर्णपणे उखडून टाकेल.”

13:00 (IST) 7 May 2025

भारतीय संरक्षण निधीसाठी पाच लाखांची देणगी; पणदूरकर दाम्पत्याच्या दातृत्वाची पुनर्प्रचिती

शिवाजी विद्यापीठाचे माजी भूगोल विभाग प्रमुख व ज्येष्ठ विधीज्ञ प्रा. डॉ. राम पणदुरकर व त्यांच्या पत्नी हेम किरण पणदूरकर यांचे समाजातून कौतुक होत असून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. …अधिक वाचा
12:44 (IST) 7 May 2025

“तोल जाऊ देऊ नका… व्यवस्थित बोला…”, मंत्री गुलाबराव पाटील यांना गुलाबराव देवकर यांचा इशारा

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना महायुतीतील कोणत्याच पक्षाने प्रवेश देऊ नये म्हणून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोध केला होता. …अधिक वाचा
12:28 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: “दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं”, ऑपरेशन सिंदूरनंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

Operation Sindoor News Updates: भारतीय लष्कराच्या या कारवाईनंतर देशभरातून समाधन व्यक्त केले जात आहे. दरम्यान भारताने दिलेल्या या प्रत्युत्तराचे सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळातील नेत्यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे. …सविस्तर वाचा
12:02 (IST) 7 May 2025

Karad Crime News: प्रेमसंबंधांच्या संशयावरून अपहरण करून बेदम मारहाणीत युवकाचा खून

दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोखंडी सळी, लाकडी दांडके व पीव्हीसी पाईपने बेदम मारहाण केली. यानंतर गंभीर जख्मी आवस्थेत रहिमतुल्लाला संशयितांनी त्याच्या घरी सोडले. …सविस्तर वाचा
11:57 (IST) 7 May 2025

Operation Sindoor Marathi Updates: “दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं” ऑपरेशन सिंदूरनंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

भारतीय लष्कराने आज पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या या कारवाईनंतर पहलगामच्या पीडितांबरोबर सर्वसामान्यांनीही याचे कौतुक केले आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहे. दरम्यान या कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी, “दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं”, असं म्हटले आहे.

11:57 (IST) 7 May 2025

Thane Rain News: ठाणे, नवी मुंबईत वाऱ्यासह पावसाच्या सरी

जिल्ह्यात मंगळवारी रात्री काही मिनीटे पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहापूर भागात शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. …अधिक वाचा
11:40 (IST) 7 May 2025

Operation Sindoor Marathi Updates: “त्यांच्यावर एवढा जोरदार हल्ला करा की…”, ऑपरेशन सिंदूरवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, “सर्व प्रकारच्या दहशतवादाचे उच्चाटन करायला हवे. आज रात्री पोओजेके मध्ये केलेले अचूक हल्ले दहशतवादाविरुद्ध आहेत आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या ठिकाणांवर अचूक हल्ला केल्याबद्दल भारतीय संरक्षण दलांचे कौतुक. त्यांच्यावर एवढा जोरदार हल्ला करा की त्यांना पुन्हा कधीही दहशतवाद करता येणार नाही. जय हिंद!”

11:21 (IST) 7 May 2025

“धर्म देख कर मारा था, धर्म बता कर मारा है, भारतीय लष्कराचे अभिनंदन”, केदार दिघे यांची प्रतिक्रिया

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. यात २६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या. …अधिक वाचा
11:15 (IST) 7 May 2025
Operation Sindoor Live Updates: सैन्यदलांची ताकद, राजकीय इच्छाशक्ती आणि देशवासीयांची एकता म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’: अजित पवार

भारतीय लष्कराने पाकिस्तानस्थित दहशतवादी तळांवर केलेल्या कारावईवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “भारतानं दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून ते नष्ट केल्याबद्दल मी भारतीय वायुसेना, नौसेना, थलसेनेच्या नेतृत्वाचं आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो. भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश एकजुटीनं त्यांच्यामागे उभा आहे.”

11:12 (IST) 7 May 2025

“लाडक्या बहिणींचे कुंकु पुसण्याचे काम करणाऱ्यांना धडा शिकवला”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

ज्यांनी आमच्या लाडक्या बहिणींचे कुंकु पुसण्याचे काम केले. त्यांना धडा शिकविल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. …सविस्तर बातमी
11:04 (IST) 7 May 2025

चार आठवड्यात निवडणुका जाहीर करणे अशक्य

आदेशाचे पालन करावयाचे झाल्यास राज्यात किमान तीन महिने निवडणूक आचारसंहिता लागू होऊन शासकीय यंत्रणेचे बरेचसे कामकाज ठप्प होण्याची भीती आहे. …सविस्तर वाचा
10:39 (IST) 7 May 2025

“Operation Sindoor हा माझ्या आईसारख्या पीडित महिलांचा सन्मान”, पुण्याच्या कौस्तुभ गणबोटे यांच्या मुलाकडून पंतप्रधानांचे आभार

Operation Sindoor Reactions: भारताच्या या लष्करी कारवाईनंतर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्याच्या कौस्तुभ गणबोटे यांच्या मुलाने प्रतिक्रिया देत, या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे. …सविस्तर वाचा
10:37 (IST) 7 May 2025

“भारताने दहशतवाद्यांवरील हल्ले सुरुच ठेवलेच पाहिजेत”, डोंबिवलीतील पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटक कुटुंबीयांची प्रतिक्रिया

दहशतवादाचा नायनाट होईपर्यंत असे हल्ले भारताने सुरूच ठेवले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटक कुटुंंबातील हर्षद संजय लेले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. …सविस्तर बातमी
10:19 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: कुंकू पुसण्याचा पाप केलं त्यांना धडा शिकवला: एकनाथ शिंदे

भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर देत पाकिस्तानस्थित दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहे. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. याचबरोबर, ज्यांनी लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचा काम केले त्यांना धडा शिकवला असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

10:12 (IST) 7 May 2025

उद्घाटन खोळंबा कायम, वाशी उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला प्रशासनाला मुहूर्त मिळेना

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानेही लवकरच मुंबईकडे जाणारा उड्डाणपुल वाहतूकीसाठी खुला केला जाणार असे सांगितले होते. परंतु ही सगळी आश्वासने हवेत विरली आहेत. …सविस्तर बातमी
10:12 (IST) 7 May 2025

Maharashtra Breaking News LIVE Updates: “बघ्याची भूमिका घेणे शक्य नव्हते,” ऑपरेशन सिंदूरनंतर शरद पवार यांनी केले लष्कराचे कौतुक

भारतीय लष्कराने ऑपरेश सिंदूर द्वारे पाकिस्तानस्थित दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, “प्रत्येक भारतीयाचा सैन्यावर पूर्ण विश्वास आहे, जे छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करतात. आज, त्याच विश्वासाचे दर्शन घडवत, भारतीय हवाई दलाने पहाटे १:३० वाजता नऊ दहशतवादी ठिकाणांवर यशस्वी हवाई हल्ले करून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत, कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला किंवा पाकिस्तानी लष्करी स्थळांना हाणी न होऊ देता नऊ दहशतवादी ठिकाणांना अचूक आणि नियोजनबद्ध पद्धतीने लक्ष्य करण्यात आले.

याचबरोबर शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत लष्कराने केलेल्या कारवाईचे कौतुक करत, पहलगामनंतर बघ्याची भूमिका घेणे शक्य नव्हते, असे म्हटले आहे.

महाराष्ट्र लाईव्ह अपडेट्स. (Photo: ANI)