महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. उकाडा आणि चटके देणारं उन हा वातावरणात झालेला बदल आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरणही तापलं आहे. अशात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी घेत आहेत सभा

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि लढा उभा केला. मराठा आरक्षणासाठी त्यांनी उपोषणही केलं होतं. निवडणुकीच्या धामधुमीतही मनोज जरांगे राज्यांतल्या विविध भागांमध्ये दौरा करत आहेत. मनोज जरांगेंच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा लागू झाला. मात्र सगे सोयऱ्यांच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. मराठा समाजाच्या नागरिकांना हा मुद्दा मनोज जरांगे राज्यातल्या विविध भागांत जाऊन समजावून सांगत आहेत. बीड दौऱ्या दरम्यान त्यांनी प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असलेल्या गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हे पण वाचा- महायुती, आघाडी दोन्ही आपल्यासाठी सारखेच : जरांगे पाटील

बीड दौऱ्यादरम्यान बिघडली प्रकृती

मराठा नेते मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली आहे. मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनोज जरांगे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना आता छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात आणण्यात आलं आहे. त्यांच्यावर आता उपचार सुरु आहेत. उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना याआधी गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण ते सध्या उपोषणाला बसले नव्हते. त्यामुळे त्यांना उन्हाचा त्रास झाल्याचा अंदाज आहे. मनोज जरांगे लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांच्या समर्थकांकडून आणि समस्त मराठा समाजाकडून केली जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha leader manoj jarange patil admitted in chhatrapati sambhajinagar galaxy hospital scj
Show comments