जत बाजार समितीच्या महिला संचालिकेचे अपहरण

विधान परिषद निवडणुकीत पेल्यातील वादळ ठरलेले कदम-दादा गटातील वाद आता बाजार समितीच्या पटलावर सुरू झाला असून यातून जतच्या महिला संचालिकेचे अपहरण नाटय़ बुधवारी रंगले. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली असून महापालिकेतील दादा-कदम गटातील संघर्ष आता बाजार समितीमध्येही टोकदार बनला आहे.

mumbai marathi news, malad accident marathi news
मालाड दुर्घटनेप्रकरणी पर्यवेक्षकाला अटक
One to three prize shares from Inox Wind
‘आयनॉक्स विंड’कडून एकास तीन बक्षीस समभाग
shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त

बाजार समितीच्या संचालिका सुगलाबाई बिरादार या आपल्या नातवासह बुधवारी संचालक मंडळाच्या बठकीसाठी समितीच्या मुख्यालयामध्ये आल्या होत्या. यापूर्वी झालेल्या दोन संचालक मंडळाच्या बठकीस त्या गरहजर राहिल्या असल्याने यावेळीही त्यांची अनुपस्थिती राहिली तर नियमानुसार त्यांचे संचालक पद रद्द होऊ शकते. यामुळे बठकीपूर्वीच त्या कार्यालयात हजर राहिल्या.

बुधवारी नूतन सभापती प्रशांत शेजाळ यांना सहीचे अधिकार देण्याच्या विषयासाठी बठक बोलावण्यात आली होती. या बठकीसाठी श्रीमती बिरादार या सकाळी अकरा वाजता येऊन सभापती कक्षाजवळील खोलीत बसल्या असताना माजी सभापती संतोष पाटील यांनी विक्रम सावंत यांनी बोलावले आहे असे सांगून बाहेर बोलावले. जीप क्र. एमएच १०-८०८ मधून त्यांना बाहेर नेऊन काही काळ फिरवले. संचालक मंडळाची बठक संपल्यानंतर त्यांना परत आणून सोडण्यात आले. यामुळे बठकीस त्यांना उपस्थित राहता आले नाही.

याबाबत श्रीमती बिरादर यांनी माजी सभापती संतोष पाटील यांच्याविरुध्द अपहरण करण्यात आली असल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आठ दिवसांपूर्वी सभापती निवडीसाठी दादा गटाने जोरदार आग्रह धरला होता. मात्र कदम गटाने हा आग्रह मोडीत काढीत कदम गटाचे शेजाळ यांची सभापती म्हणून निवड करण्यात यश मिळविले होते. बाजार समितीच्या १९ संचालकांमध्ये कदम गटाचे ६, तर अजितराव घोरपडे गटाचे ४ आणि विशाल पाटील गटाचे १ संचालक आहेत. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना-१, हमाल-मापाडी-१, जनसुराज्य-१ आणि व्यापारी २ असे बलाबल आहे.

बाजार समितीचे कार्यक्षेत्र मिरज, कवठेमहांकाळ आणि जत असे तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असून देशातील सर्वाधिक आíथक उलाढाल या बाजार समितीतून होत असल्याने येथील सत्ता महत्त्वाची मानली जाते. या सत्तेसाठी विशाल पाटील आणि घोरपडे हे एकत्र आले असून या गटाशी श्रीमती बिरादार यांनी संपर्क साधल्याचा संशय कदम गटाला आहे. यातूनच त्या सभापती निवडीच्या बठकीस गरहजर राहिल्याचा कयास असल्याने या बठकीलाही गरहजर ठेवून पदावरून गच्छंती करण्याचा डाव यामागे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.