Premium

“…तशीच स्थिती अजित पवार मित्रमंडळ व शिंदे गटाची होईल”, रोहित पवारांचा टोला; भाजपाचा उल्लेख करत म्हणाले…

रोहित पवार म्हणतात, ” भाजपाला लोकनेते चालत नाहीत. लोकांमधले पक्ष चालत नाहीत. भाजपाबरोबर जाणारे पक्ष किंवा नेत्यांना हळूहळू…!”

rohit pawar ajit pawar bjp
रोहित पवार यांचं भाजपावर टीकास्र! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवत उत्तरेकडील हिंदी भाषिक पट्ट्यात आपलंच वर्चस्व सिद्ध केलं. त्यामुळे विरोधकांकडून यासंदर्भात कारणमीमांसा केली जात असताना महाराष्ट्रातही या निकालांचे पडसाद उमटू लागले आहेच. सत्ताधारी तिन्ही मित्रपक्षांचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसत आहे. या सर्व परिस्थितीसंदर्भात बोलताना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर परखड शब्दांत भाष्य केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसनं बाजी मारली असून मिझोरममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंटनं विजय मिळवला आहे. तीन राज्यांमधील विजयामुळे भाजपामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. मात्र, त्याचवेळी तेलंगणातील विजयामुळे काँग्रेसला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी राजस्थान व छत्तीसगडमधील सत्ता गमावल्यामुळे पक्षामध्ये पराभवाचं चिंतन चालू झाल्याचं सांगितलं जात आहे.

रोहित पवार म्हणतात, “२०१४नंतर गोष्टी बदलल्या”

दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी २०१४ नंतर, अर्थात नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या टर्मपासून गोष्टी बदलल्या असल्याचं म्हटलं आहे. “भाजपा हळूहळू शिवसेनेची ताकद कमी करत गेलं. मुंबई महानगर पालिकेतही तेच झालं. आमदारांची संख्याही उलट झाली. म्हणजे शिवसेना कमी झाली आणि भाजपा वाढली. हळूहळू अपक्ष उमेदवार उभे करणं किंवा शिवसेनेचे उमेदवार पाडणं, अशा खेळी भाजपाने केल्या”, असं रोहित पवार म्हणाले.

“बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या”; राऊतांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाच्या नेत्याचं उत्तर, …

“भाजपाच्या या धोरणानंतर शिवसेना शहाणी झाली आणि त्यांनी महाविकास आघाडीत येऊन एक वेगळं समीकरण सगळ्यांना दाखवलं”, असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.

“भाजपाला लोकनेते चालत नाहीत”

यावेळी बोलताना रोहित पवारांनी भाजपाच्या धोरणावर भाष्य केलं. “भाजपाकडून जी परिस्थिती शिवसेनेची करण्याचा प्रयत्न झाला, तशीच स्थिती अजित पवार मित्रमंडळ व एकनाथ शिंदे गटाची होईल, अशी चर्चा लोकांमध्ये चालू आहे. सगळ्यांनीच याची दक्षता घेतली पाहिजे. भाजपाला लोकनेते चालत नाहीत. लोकांमधले पक्ष चालत नाहीत. भाजपाबरोबर जाणारे पक्ष किंवा नेत्यांना हळूहळू राजकीय जीवनातून संपवलं जातं”, असा गंभीर दावा रोहित पवार यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp mla rohit pawar slams bjp for targeting shivsena ajit pawar pmw

First published on: 05-12-2023 at 12:43 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा