राष्ट्रवादीचे आमदार सुरेश धस यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी तलावातील गाळ काढण्याच्या कामासाठी कर्ज देण्यास बँक अधिकारी टाळाटाळ करीत असल्याच्या कारणावरून हैदराबाद बँकेच्या पाटोदा शाखेत राष्ट्रवादीचे आमदार सुरेश धस व बँकेचे शाखाधिकारी यांच्यात वादावादी झाली. या वेळी सुरक्षारक्षकाने बंदूक ताणल्यामुळे गोंधळ उडाला आणि कार्यकर्त्यांनी बँकेत राडा करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करून सामानाची तोडफोड केली. या प्रकाराबाबत काल (शुक्रवार) रात्री रात्री उशिरा आमदार धस यांच्यासह ३२जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी यातील सातजणांना पोलिसांनी अटक केली.
बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी व सूचनेनंतर शाखा व्यवस्थापक थिगळे यांच्या तक्रारीवरून आमदार धस यांच्यासह ३२ जणांविरुद्ध गोंधळ घालणे, मारहाण करणे व सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.