Premium

“७० जणांनी अध्यक्षपदासाठी माझं नाव दिलं, त्यापैकी…”, दिल्लीतील बैठकीत शरद पवारांचं मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरीनंतर पक्षावर दावा करणाऱ्या अजित पवार गटावर सडकून टीका केली.

Sharad Pawar in Delhi 3
(छायाचित्र – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फेसबूक पेज)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरीनंतर पक्षावर दावा करणाऱ्या अजित पवार गटावर सडकून टीका केली. तसेच तालकटोरा येथील पक्षाच्या बैठकीचा आणि निवडणुकाचा उल्लेख करत अनेक सवाल उपस्थित केले. यावेळी शरद पवारांनी तालकटोरा येथील बैठकीत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ७० जणांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव देत स्वाक्षऱ्या केल्याचंही सांगितलं. ते गुरुवारी (५ ऑक्टोबर) दिल्लीत आयोजित पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “आपल्याच जुन्या सहकाऱ्यांनी आपल्याविरोधारात निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. त्याचं उत्तर आज दिल्लीतील कार्यकारणीच्या बैठकीत झालेल्या ठरावाने दिलं आहे. ते लोक म्हणतात की, तेच राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. तालकटोरा येथे झालेल्या बैठकीतील राष्ट्रीय अध्यक्षाची निवडच चुकीची आहे. ते म्हणतात की, निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना काहीच अधिकार नाहीत. यापुढे जाऊन ते म्हणतात की, तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे अध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत आणि पक्षाचं नाव, पक्षचिन्ह याचा वापर करण्याचा अधिकार केवळ त्यांनाच आहे. आपल्याला नाही.”

“तालकटोराच्या बैठकीत ७० जणांनी उमेदवार म्हणून माझं नाव दिलं”

“मजेची गोष्ट म्हणजे तालकटोरा येथे जी पक्षाची बैठक झाली तेथे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तेथे निवडणूक घेण्याची जबाबदारी ‘रिटर्निंग ऑफिसर’कडे होती. त्यांनी निवडणुकीची प्रक्रिया कशी असेल ते सर्वांसमोर सांगितलं. तसेच दोन दिवसांचा वेळ दिला. त्यानंतर ७० जणांनी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यात एकच नाव दिलं, ते म्हणजे माझं नाव,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा : त्यांचा एक भंपक…”, राष्ट्रपती राजवटीवरून शरद पवारांवर आरोप करणाऱ्या फडणवीसांना राऊतांचं प्रत्युत्तर

“माझ्या नावाचा प्रस्ताव देताना स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये आज निवडणूक बेकायदेशीर म्हणणारेही”

“ज्या ७० लोकांनी माझ्या नावाचा प्रस्ताव दिला त्यात असे काही लोक आहेत जे आज ते म्हणतात की, ही तालकटोराची बैठक कायद्यानुसार झाली नाही. तसेच तेथील निवडणूक बेकायदेशीर होती. मजेची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत उमेदवारी अर्जात माझ्या नावाचा प्रस्ताव देताना स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये आज निवडणूक बेकायदेशीर होती म्हणणारेही होते,” असं म्हणत शरद पवारांनी अजित पवार गटातील नेत्यांना टोला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar answer ajit pawar faction claim on ncp party election symbol pbs

First published on: 05-10-2023 at 15:45 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा