महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला सोमवारी घटस्थापनेने प्रारंभ झाला. संबळाचा निनाद व आई राजा उदो-उदोच्या जयघोषात चांदीच्या सिंहासनावर तुळजाभवानी देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. दिवसभरात हजारो भाविकांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सोमवारी मध्यरात्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा पूर्ण झाली. मध्यरात्री एक वाजता तुळजाभवानी देवीच्या पुजार्‍यांनी देवीची मूर्ती चांदीच्या सिंहासनावर प्रतिष्ठापित केली. मूर्ती सिंहासनावर बसवल्यानंतर परंपरेने दही, दुधाचे अभिषेक घालण्यात आले. दरम्यान, दर्शनरांगामधून देवीचे दर्शन घेण्यास सुरुवात करण्यासाठी सकाळी सात वाजता पुन्हा अभिषेकाची घाट झाली. अभिषेक पूर्ण झाल्यानंतर देवीस अलंकार चढवण्यात आले. शाकंभरीचे सतीश सोमाजी, पाळीचे पुजारी दिग्विजय पाटील यांनी अंगारा काढला. अंगारासोबत घटाची मिरवणूक काढण्यात आली.

Pankaja Munde Jarange Patil on a platform in Beed
बीडमध्ये पंकजा मुंडे, जरांगे पाटील एका मंचावर
uran marathi news, gaon dev yatra
उरण परिसरात गावदेवांच्या जत्रा सुरू
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती

आई राजा उदो-उदो, सदानंदीचा उदो-उदो अशा जयजयकारात संबळाच्या कडकडाटामध्ये वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीने घटस्थापना करण्यात आली. शाकंभरी नवरात्र निमित्ताने या गावांमध्ये बसवण्यात आलेल्या घटामध्ये धनधान्य अर्पण करण्यात आले. या घटस्थापनेबरोबर तुळजाभवानी देवीचे नऊ दिवसांचे निरंकार उपवास करण्यास सुरुवात केली.