वाई : आमचे कुटुंब शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत काम करीत आहे. परंतु अजित पवार यांनी फारकत घेवून मलाही
त्यांच्याबरोबर किसन वीर आणि खंडाळा कारखान्यासाठी व मतदारसंघातील विकास कामांसाठी जावे लागले. त्यावेळी नऊजणांबरोबर कॅबिनेट मंत्र्यांची शपथ मलाही देत होते. मात्र किसन वीर आणि खंडाळा साखर कारखान्याला जोपर्यंत मदत होत नाही, तोपर्यंत मी शपथ घेणार नाही असे अजित पवार यांना सांगितल्याचे वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी आज स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या विधिमंडळाची ५२ वी वार्षिक सभा आमदार मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, संचालक शशिकांत पिसाळ, राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस प्रतापराव पवार उपस्थित होते.

हेही वाचा – सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या, “दिल्लीचा अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात”

मकरंद पाटील म्हणाले, किसन वीर आणि खंडाळा कारखान्याच्या निवडणुका कार्यकत्यांच्या आग्रहाखातर लढविल्या मात्र, त्या जर लढविल्या नसत्या तर आज दोन्ही कारखाने लिलावात गेले असते. किसन वीरला पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असताना उपलब्ध ऊस, एक लाख लिटरची डिस्टीलरी तसेच प्रचंड आर्थिक सुबत्ता असताना कारखाना बंद पडण्याची वेळ मागील व्यवस्थापनाने आणली आहे. गेल्या चार पाच हंगामात शेतकऱ्यांना उसाचे बिल मिळाले नाही, कामगारांचे पगार मिळाले नाहीत, व्यापाऱ्यांची ९० कोटींची देणी राहिली आहे. त्यामळे कारखान्यावर एक हजार कोटींचे कर्ज झाले आहे. किसन वीर कारखान्याचे सध्या ऑडीट सुरू आहे. त्यामध्ये मागील काळात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे उघड होत आहे. कारखान्याचा पत्रासुद्धा संचालकांनी पळविला आहे.

आता थकहमीच्या माध्यमातून निश्चितपणे मदत मिळणार आहे. त्यासाठी संचालकांच्या मालमत्ता गहाण ठेवाव्या लागणार आहेत. त्यामुळे दोन्ही कारखाने चांगल्या सुस्थितीत येण्यासाठी चांगला मार्ग काढू. या वर्षाच्या हंगामासाठी कारखान्याची यंत्रणा सज्ज केली असून तोडणीसाठी सुमारे १७ कोटी ६० लाख रुपये पोहोच केले आहेत. खंडाळा कारखान्यासाठी भागभांडवल जमा करण्याचे काम सुरु आहे. हा कारखाना स्थितीत आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे असेही आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा – सातारा : वाघनखं खोटी आहेत हे सिद्ध करून दाखवा – शिवेंद्रसिंहराजे

या सभेत दोन्ही कारखान्यांसाठी राज्य शासनाची थकहमी घेण्यास व आवश्यकता भासल्यास खंडाळा कारखान्यास चालक पाहण्यास, प्रतापगड कारखान्याचा भागीदारी करार खंडित करण्यास मंजुरी देण्यात आली. उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविक आणि विषयानुसार सभेला माहिती दिली. दिलीप पिसाळ यांनी आभार मानले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Until kisan veer factory get help no oath till then says makarand patil ssb