महाराष्ट्रातली सर्व दुकानं आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणजे घेण्यात आला आहे. या निर्णयावरुन राज्यात श्रेयवादाची लढाई सुरु असतानाच काहींनी याला विरोध देखील केला आहे. या निर्णयाबाबत व्यापारी संघटनांसह काही राजकीय पक्षांनी टीका केली आहे. दुकानांच्या पाटीवर मोठ्या अक्षरात नाव लिहलाना कोणत्या भाषेचा वापर करावा, हा व्यापाऱ्यांचा हक्क आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय व्यापाऱ्यांवर अन्यायकारक ठरणार आहे. दुकानदारांना राजकारणापासून दूर ठेवा, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले होते.

“विरोध करतो म्हणजे काय… तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र किंवा मग कर्नाटक प्रत्येक राज्याला अधिकार आहे, त्या भाषेचा अधिकार आहे. विरोध कसला करत आहात…तुम्हाला मुंबईत राहायचं आहे, महाराष्ट्रात राहायचं आहे हे विसरु नका. तुम्हाला येथे राहायचं आहे, व्यापार करायचा आहे. हे काही व्यक्तिगत किंवा राजकीय भांडण नाही कोणाचं. करणार नाही म्हणजे काय?”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सुनावलं होतं.

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Man Stabbed to Death for Confronting Women Smoking in Public Three Arrested
नागपूर : सिगारेट ओढणाऱ्या तरुणींना हटकणे युवकांचे जीवावर बेतले

“मराठीवर इतकं प्रेम आहे तर दुकानांच्या पाट्या सरकारी खर्चातून बदलाव्यात”

तसेच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही या निर्णयावरुन टीका करत मराठीवर इतकं प्रेम आहे तर दुकानांच्या पाट्या सरकारी खर्चातून बदलाव्यात असे म्हटले आहे. त्यावरही संजय राऊत यांनी याबाबत भाष्य केले होते. महाराष्ट्रात राहत आहात, येथील मातीचं खात आहात, श्वास घेत आहात याचे ऋण फेडण्याची वेळ असताना तुम्ही महाराष्ट्रासंदर्भात अशी वक्तव्यं करणं याला बेईमानी म्हणतात. मग तो खासदार, व्यापारी किंवा कोणीही असो,” असे संजय राऊत यांनी म्हटले.

“आमच्या पक्षातून बाहेर गेले…”, मराठी पाट्यांवर राज ठाकरेंनी दिलेल्या सल्ल्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

त्यानंतर आता भाजपाने संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरुन जोरदार टीका केली आहे. हिंमत असेल तर हीच भाषा भेंडी बाजार, भायखळा इथल्याही अमराठी पाट्यांना दाखवा असे आव्हान भाजपाने संजय राऊत यांना दिले आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत संजय राऊत यांना हे आव्हान दिले आहे.

“तुम्ही खुर्च्याच उचला…”; शरद पवारांच्या इतकी उंची गाठा म्हणणाऱ्या संजय राऊतांना भाजपाचा टोला

“हीच भाषा, हीच मग्रुरी, हाच रुबाब मोहम्मद अली मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार, भायखळा इथल्याही अमराठी पाट्यांना दाखवा… पाहूया तुमची हिंमत… औकात असेल तर करून दाखवा, असे आव्हान,” अतुल भातखळकर यांनी दिले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने १२ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या बैठकीत घेतला आहे. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आस्थापनेचा नामफलक हा मराठीबरोबरच इतर भाषेतही लिहिता येईल. परंतु, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये.