सांगली : कंत्राटी नोकरभरती कमिशनसाठीच केली जात असून बेरोजगारांना देशाधडीला लावण्याचा हा उद्योग सरकारने बंद करावा, अन्यथा तरुणांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी सांगलीत दिला. राज्यात होत असलेल्या कंत्राटी नोकरभरतीला विरोध करण्यासाठी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी भव्य मोर्चा काढण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वंचित युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष इंद्रजित घाटे यांनी मोर्चाचे संयोजन केले. सांगलीतील विश्रामबाग चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील हजारो बेरोजगार आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी आंबेडकर यांनी देशातील बेरोजगारी, सरकारची धोरणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाचा कारभार चालवण्याच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.

हेही वाचा – “मी दररोज बँकांच्या पाया पडतेय”, आर्थिक तंगीबाबत पंकजा मुंडेंनी मांडली व्यथा

पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत किंवा ज्या पद्धतीने कारभार करत आहेत ते पाहता त्यांनी देश विकायला काढला आहे अशी घणाघाती टीका यावेळी आंबडेकर यांनी केली. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना शासकीय नोकर्‍यांच्या परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार बंद करा, अन्यथा सरकारला गंभीर परिणामांना सामोर जावे लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा – “…म्हणून मी कोणत्याही आधाराशिवाय टिकले”, संघर्षकन्येनं सांगितलं सहनशीलकन्या होण्यामागचं कारण!

शासनाने गेल्या ६ सप्टेंबरला खासगी कंपन्यांशी संगनमत करून राज्यातील नोकरभरतीचा घातकी निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांचे हे कारस्थान आहे. पंधरा ते वीस टक्के कमिशनवर ही नोकरभरती होत आहे. इंग्रजांप्रमाणेच देशलुटीचे हे कारस्थान आहे. भविष्यात हा भस्मासूर वाढतच जाणार आहे असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit aghadi march against contract recruitment in sangli ssb