Baba Ramdev Patanjali Legal Notice : आयुर्वेद आणि नैसर्गिक औषधांपासून उत्पादने बनवण्याचा दावा करणाऱ्या पतंजली या कंपनीविरोधात गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत कंपनीला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली आहे. कंपनीची टूथपेस्ट दिव्या दंत मंजनमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. विशेष म्हणजे कंपनी त्यावर हिरवे लेबल लावते, म्हणजे हे उत्पादन पूर्णपणे शाकाहारी असल्याचं सांगत ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचंही तक्रारदाराचं म्हणणं आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही पतंजली आणि रामदेव बाबा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

कोलगेट “आमच्या टूथ पेस्टमध्ये नमक आहे”, असं स्पष्ट सांगून आपले उत्पादन विकते. बाबा रामदेव यांची पतंजली मात्र, “आमची टूथपेस्ट शाकाहारी आहे” असे सांगून, लोकांना “फिश बोन” (माशांची हाडे) युक्त मासांहारी टूथपेस्ट विकत आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

A case has been registered against the girlfriend who killed her boyfriend Nagpur crime news
प्रियकराचा खून करणाऱ्या प्रेयसीवर गुन्हा दाखल; हुडकेश्वर पोलिसांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
Jitendra Awhad
“ठाण्यात ‘वरून’ हा शब्द सुरू झालाय, तो कुठून येतो? हे…”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Rajnath singh
“मासे खा, डुक्कर, हत्ती खा नाहीतर घोडा खा, पण…?” तेजस्वी यादवांच्या व्हीडिओवर राजनाथ सिंहांचा टोला

हेही वाचा >> पतंजलीच्या शुद्ध शाकाहारी ‘दिव्य दंत मंजन’मध्ये Cuttlefish ची हाडं वापरल्याचा आरोप, धाडण्यात आली कायदेशीर नोटीस

“हा बाबा रामदेव वर विश्वास ठेवणाऱ्या करोडो लोकांचा विश्वासघात आहे. त्यांनी लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन, शाकाहारी लोकांना मासांहरी उत्पादने विकली आहेत. पतंजली उत्पादने प्रमोट करणाऱ्या लोकांनी देखील 10 वेळा विचार करावा की, आपण आपले खिसे लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडून तर भरत नाही आहोत ना याचा”, असंही ते ट्वीटमध्ये पुढे म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

दिल्लीत वकील म्हणून कार्यरत असलेल्या वकील शाशा जैन पतंजलीला नोटीस धाडली आहे. शाशा जैन यांनी आपल्या नोटीससह सगळे दस्तावेजही जोडले आहेत. या दस्तावेजात त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलं आहे की दिव्य दंतमंजन शाकाहारी आहे असं म्हटलं गेलं आहे. त्यावर हिरव्या रंगाचे लेबलही लावले आहे. मात्र दिव्य दंत मंजन यामध्ये Samudra Fen वापरण्यात आलं आहे. ग्राहकांसह केलेला हा धोका आहे. ग्राहकांची ही शुद्ध फसवणूक आहे. लेबलिंग नियमांचं पतंजलीने उल्लंघन केलं आहे असंही या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

शाशा जैन यांनी असंही म्हटलं आहे की माझ्या कुटुंबातले काही सदस्य, काही परिचयाचे लोक दिव्य दंतमंजन वापरताता. मात्र या दंत मंजनात Cuttlefish सारखे मांसाहारी घट वापरले आहेत. हे समजल्यानंतर त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. पतंजलीकडून याबाबत स्पष्टीकरण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता उत्पादनांवर विश्वास कसा ठेवायचा असंही त्यांनी विचारलं आहे.