वाई : आसले गावच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण

त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा व फक्त दहा महिन्याची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे.

Somnath Mandhare

सोमनाथ मांढरे हे वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र आहेत. त्यांची लडाख येथे नेमणूक करण्यात आली होती. यावेळी हवामानातील बदलामुळे पहाटेपासूनच त्यांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच ते बेशुद्ध झाले. त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती सायंकाळी कुटुंबियांना देण्यात आली.

देश सेवा करत असताना अतिशय प्रतिकूल वातावरणाचा सामना करत असताना त्यांना हे वीरमरण आले. वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांना याबाबत माहिती मिळाली. आसले (ता वाई )येथील सोमनाथ मांढरे यांचे बंधू असलेले महेश मांढरे यांना याची माहिती दिली आहे. सोमनाथ मांढरे यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा व फक्त दहा महिन्याची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे. जवान सोमनाथ मांढरे यांचे पार्थिव उद्या पहाटे दिल्ली येथे पोहोचेल. सायंकाळपर्यंत आसले या मूळ गावी पोहचेल. त्यांच्यावर शासकीय इतमामात असले येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wai soldier somnatth mandhare died in ladakh due to weather change vsk