News Flash

मला अटक झालेली नाही; एजाज खानची पोस्ट चर्चेत

काय आहे नक्की प्रकरण जाणून घ्या

काही दिवसांपूर्वी अभिनेता एजाज खानला ड्रग्ज प्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने(एनसीबी) अटक केली. त्यामुळे बिग बॉस १४मधील स्पर्धक एजाज खानला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अटक झालेला एजाज खान आणि बिग बॉस १४मधील स्पर्धक एजाज खान या दोघांची नावे सारखी असल्यामुळे अनेकांचा गोंधळ झाला आहे. त्यामुळे आता बिग बॉस १४मधील स्पर्धक एजाज खानने पोस्ट शेअर करत ‘मला अटक झालेली नाही’ असे म्हटले आहे.

एजाजने ट्विटर अकाऊंटवर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ड्रग्ज प्रकरणी ज्या एजाज खानला अटक झाली आहे तो मी नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ‘E I J A Z K H A N. तुम्हा लोकांचा अजूनही गोंधळ होत असेल तर मी तुम्हाला सांगतो इच्छितो… मी माझा नवीन चष्मा लावला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मला अटक झाली आहे तर तुम्हाला देखील चष्मा लावण्याची गरज आहे’ असे कॅप्शन एजाजने दिले आहे. त्यासोबतच त्याने हॅशटॅग देत ‘मेरे को फरक नही पडता’ असे म्हटले आहे.

एजाज खानला या संबंधी अनेक फोन आणि मेसेज आले होते. तसेच त्याच्या वडिलांना देखील अनेकांनी फोन आणि मेसेज केले. अखेर एजाजने सोशल मीडियावर स्वत:चा फोटो शेअर करत मला अटक झालेली नाही असे म्हटले.

काही दिवसांपूर्वी एजाज खानने ‘बिग बॉस १४’मध्ये सहभाग घेतला होता. या शोमधील एजाजचा अनोखा अंदाज, खेळण्याची स्टाइल प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतर असल्याचे पाहायला मिळाले. तसेच बिग बॉसच्या घरात एजाज आणि पवित्रा पुनिया यांची ओळख झाली. आता ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 11:24 am

Web Title: eijaz khan bigg boss 14 fed up people mistaking him for ajaz khan actor arrested ncb avb 95
Next Stories
1 मिका सिंग करणार ‘या’ अभिनेत्रीशी लग्न, व्हिडीओ व्हायरल
2 चित्रीकरणस्थळी ‘करोना’दक्षता!
3 “ये क्या हुआ, कैसे हुआ…..”, ‘या’अभिनेत्रीला झाली करोनाची लागण
Just Now!
X