अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहात आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रुज देखील भाग घेणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या टॉम क्रुजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहूनच प्रेक्षक काहीसे गोंधळात पडले आहेत. त्यामुळे पडताळून पाहूया या व्हिडीओमागचे खरे सत्य…

अवश्य पाहा – “तुझं ऐकून आम्ही पानमसाला खातोय”; Immunity Booster च्या जाहिरातीवरुन अजय देवगण ट्रोल

अवश्य पाहा – संजय मोनेंसाठी मित्राने चक्क ट्रेन थांबवून ठेवली होती; कारण…

मेल फिशर नावाच्या एका व्यक्तीने १३ ऑगस्ट २०१९ रोजी टॉम क्रुजच्या नावाने एक व्हिडीओ ट्विट केला होता. “टॉम क्रुज राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरला तर काय होईल?” अशी कॉमेंट त्याने या व्हिडीओवर केली होती. या व्हिडीओमधील व्यक्ती हुबेहुब टॉम सारखाच दिसतो. माझ्यासोबत निवडणुकीच्या शर्यतीत पळा असं आवाहन तो या व्हिडीओमध्ये करत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक काहीसे गोंधळले. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेता जेम्स वूड यांनी देखील हा व्हिडीओ रिट्विट केला. त्यामुळे लोकांचा गोंधळ आणखी वाढला. परिणामी टॉम क्रुज खरंच निवडणुकीत उतरणार की काय? अशा चर्चा रंगू लागल्या.

खरं तर टॉम क्रुज कुठल्याही निवडणुकीत भाग घेणार नाही. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला होता. परंतु अमेरिकन निवडणुक जवळ आल्यामुळे आता पुन्हा एकदा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. यापूर्वी अशीच काहीशी चर्चा अभिनेता ड्वेन जॉन्सनच्या बाबतीतही सुरु होती.