08 March 2021

News Flash

आयुष्य खूप अस्थिर आहे म्हणत.. सोनालीला रडू कोसळले!

सोनाली सांगते ऐका चा नवीन पॉडकास्ट !

सध्या कोविड लॉक डाउन मध्ये आज आपल्याला आपले जवळचे मित्र मैत्रिणी यांना भेटायला सुद्धा मिळत नाही. पण आपल्या आयुष्यात अशा अनेक जवळच्या व्यक्ती असतात ज्यांना आपण विसरून जातो किंवा त्या आपल्यापासून एवढ्या लांब जातात की त्यांच्याशी आपल्याला कोणताच संबंध ठेवता येत नाही. त्या लोकांनी एखाद्या काळात आपल्याला प्रेम दिलं असतं,  माया केलेली असते, महत्वाचे सल्ले दिलेले असतात आणि कदाचित आपणच त्याला महत्व दिलेले नसते .

मात्र कधी ना कधी या सगळ्या गोष्टींची आपल्याला आठवण होते आणि त्या गोष्टींचे महत्व समजते पण तेव्हा ती वेळ निघून गेली असते. नुकतेच इरफान खान आणि ऋषी कपूर सारखे दिग्गज कलाकार वेळेआधी सर्वाना सोडून निघून गेले  आणि सोनालीला तिच्या एका अशाच वेळेआधी सोडून गेलेल्या जवळच्या मैत्रिणीची आठवण आली आणि तिला रडू कोसळले .

या शुक्रवारी ८ मे रोजी मैत्री किती घट्ट आणि प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्वाची असते  आणि योग्य वेळी त्या मैत्रीला त्याचे महत्व देणं हे किती छान असतं हे सोनाली कुलकर्णी हॅशटॅग कन्टेक्टच्या साहाय्याने तिच्या प्रेक्षकांना हब हॉपर या ऍपवर पॉडकास्ट च्या साह्यायाने सांगणार आहे .सोनालीची अशी ही इमोशनल बाजू ऐकण्याची संधी आपल्याला या पॉडकास्टमुळे मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 6:23 pm

Web Title: sonalee kulkarni get emotional in her next podcast episode of sangte aayka scj 81
Next Stories
1 सुपरहिरो चाहत्यांचा घेतला धसका; पिस्तुल घेऊन झोपतो ‘हा’ दिग्दर्शक
2 नेहा कक्करने केला नवा विक्रम, जगभरातील गायिकांना टाकले मागे
3 प्रवीण तरडेचा ‘बॉलिवूड पॅटर्न’; सलमानसोबत शेअर करणार स्क्रीन
Just Now!
X