News Flash

Video: व्हिसा न घेताच अभिनेता पोहोचला दुबई अन्…

सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सांगितला अनुभव

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पण आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. या चर्चा विवेकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केल्यामुळे सुरु झाल्या आहेत. या व्हिडीओमध्ये विवेक सांगताना दिसत आहे की, काही खासगी कामासाठी तो UAEला पोहोचला. तेथे पोहोचल्यावर त्याला विमानतळावर अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

नुकताच विवेकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘मी माझ्या खासगी कामासाठी दुबईला आलो आहे. पण सकाळी माझ्यासोबत काही गोष्टी घडल्या आणि मला त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. जेव्हा मी दुबईमध्ये आलो तेव्हा माझ्या लक्षात आले की मी व्हिसाची कॉपी आणलेली नाही. त्याची हार्ड आणि सॉफ्ट कॉपी माझ्याकडे नव्हती. त्यामुळे सगळा गोंधळ झाला’ असे विवेक म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

आणखी वाचा- अमिताभ बच्चन यांनी केली रिटायरमेंटची घोषणा? म्हणाले, “मी सर्वांची माफी मागतो पण…”

पुढे तो म्हणाला, ‘तुम्ही इकडे आल्यानंतर व्हिसा काढू शकता पण तुम्ही जर व्हिसा आधीच काढला असेल तर तो पुन्हा काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे माझ्यासाठी सगळ्या गोष्टी कठिण झाल्या होत्या. मी मला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानते. आपण दुबईमधील लोकं थोडी स्ट्रीक्ट आहेत असं म्हणतो पण तसं नाही. ते खूप चांगले आहेत. विमानतळावरील सर्व अधिकाऱ्यांनी मला मदत केली. मी सगळ्या अधिकाऱ्यांचे आणि दुबई विमानतळावर माझी मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानतो.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 11:26 am

Web Title: vivek oberoi reached uae without visa avb 95
Next Stories
1 Video : सुदेश लहरींनी केली सूनबाईंची तक्रार; म्हणाले…
2 “वडिलांशी खोटं बोलून केली ही गोष्ट”; जान्हवी कपूरने केला खुलासा
3 ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत चिमुकल्या पाहुण्याचं होणार आगमन
Just Now!
X