प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव हा त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी आणि कमाल विनोदबुद्धीसाठी प्रसिद्ध आहे. सिद्धार्थ हा विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून हसायला लावतो. सिद्धार्थ हा नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असतो. सिद्धार्थच्या लेकीचा आज वाढदिवस आहे. नुकतंच त्याने तिच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिद्धार्थ हा इन्स्टाग्रामवर नेहमी सक्रीय असतो. नुकतंच त्याने त्याची लेक स्वरा हिच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने तिचे काही गोड फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने तिच्या जुन्या फोटोंचा एक व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे.

पत्नी तृप्तीपासून घटस्फोट घेण्यावर सिद्धार्थ जाधवचं स्पष्टीकरण, म्हणाला “आम्ही…”

“25 जून, माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस… स्वराचा वाढदिवस.. तुझ्या सगळ्या ईच्छा, स्वप्न पूर्ण होवोत..आणि बाबा आहेच ती पूर्ण करायला..अजून खूप मज्जा करत राहू..lv u forever swara…,” अशी पोस्ट त्याने केली आहे.

दरम्यान सिद्धार्थ जाधव हा त्याच्या कुटुंबाला नेहमीच प्राधान्य देत असतो. सिद्धार्थ आपल्या कामामध्ये सिद्धार्थ कितीही व्यग्र असला तरी तो कुटुंबाला वेळ देणं विसरत नाही. सिद्धार्थला ईरा आणि स्वरा अशा दोन गोड मुली आहेत. या दोन मुलींना घेऊन काही दिवसांपूर्वी तो दुबई ट्रिपला गेला होता. यादरम्यान त्याने काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते.

रेल्वे स्टेशनवर प्रपोज ते कुटुंबियांचा विरोधात जाऊन केलेलं लग्न, सिद्धार्थ आणि तृप्तीची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’

कामामधून निवांत वेळ काढून सिद्धार्थने ईरा आणि स्वरा या आपल्या दोन मुलींसोबत दुबई ट्रिप केली होती. या ट्रिपदरम्यान सिद्धार्थने आपल्या मुलींबरोबर खूप धम्माल-मस्ती केली. यात तो दोन्ही मुलींना खांद्यावर घेऊन दुबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor siddharth jadhav share instagram post for daughter swara birthday nrp
First published on: 25-06-2022 at 18:02 IST