देशभरात करोना विषाणूची दहशत पाहायला मिळतेय. अनेकजण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळत असून घरूनच काम करत आहेत. चित्रपट, मालिका, जाहिराती या सर्वांचं शूटिंगही रद्द करण्यात आले आहेत. अशात जर तुम्ही घरी बसून कंटाळला असाल, तर प्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी अजय-अतुल तुमचं मनोरंजन करणार आहे. कारण या लोकप्रिय जोडीचा लाइव्ह कॉन्सर्ट प्रेक्षकांना घरी बसल्या पाहायला मिळणार आहे.

कलर्स मराठी वाहिनीवर २२ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता ‘अजय अतुल लाइव्ह इन कॉन्सर्ट २०२०’ हा सुरेल संगीतमय कार्यक्रम प्रसारित होणार आहे. लोकांच्या मनाचा ठाव घेणारी गाणी, हजारो लोकांनी भरलेले मैदान, टाळ्यांचा कडकडाट, आंतरराष्ट्रीय वाद्यांच्या ताफ्याने सजलेला रंगमंच आणि साथीला गाण्यातले दोन धृवतारे अजय – अतुल त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाची मेजवानीच ठरणार आहे. या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना निखळ संगीताचा आनंद मिळणार आहे.

Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
The Phenom Story Music Surili Maithili thakur YouTube channel
फेनम स्टोरी: सुरिली मैथिली

भारतीय संगीताला अजय – अतुल या जोडीने एका वेगळयाच उंचीवर नेऊन ठेवले आहे आणि यांची संगीत मैफल घरबसल्या ऐकायला मिळणे म्हणजे पर्वणीच नाही का? या कार्यक्रमात प्रेक्षकांना अजय अतुल यांच्या संगीत कारकीर्दीतील अनेक गाजलेली गाणी ऐकण्याचा आनंद मिळणार आहे. नटरंग चित्रपटातील नटरंग उभा, अग्गं बाई अरेच्चातील मल्हारवारी, दुर्गे दुर्गट भारी सावरखेड एक गाव चित्रपटातील, आई भवानी अशी लोकप्रिय गाणी या कार्यक्रमात सादर होणार आहेत. तसेच अप्सरा आली, वाजले की बारा, सैराट चित्रपटातील झिंगाट अशी अतिशय लोकप्रिय गाणी प्रेक्षकांना पुन्हा एकदा ताल धरायला भाग पाडणार आहेत.