ऑगस्ट हा महिना अक्षय कुमार याचा ‘रुस्तम’ आणि हृतिक रोशन याचा ‘मोहोंजोदारो’ या दोन सिनेमांमध्ये असणाऱ्या स्पर्धेमुळे गाजला तर सप्टेंबरमध्येही अनेक दमदार सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. सप्टेंबरमध्ये एन दोन नाही तर तब्बल आठ सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. सोनाक्षी सिन्हाच्या ‘अकिरा’पासून ते कतरिना कैफच्या ‘बार बार देखो’पर्यंत आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘पिंक’पासून ते महेंद्रसिंग धोनीचा चरित्रपट ‘एमएस धोनी- अनटोल्ड स्टोरी’पर्यंत सप्टेंबर महिना भरपूर मनोरंजन आणि करमणुकीचा असणार आहे.
सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेला ‘अकिरा’, नावाजलेले दिग्दर्शक एआर मुर्गुदास यांनी दिग्दर्शित केला आहे. मुर्गुदास यांनी गजनीसारखा सिनेमा दिग्दर्शित केला होता. ‘अकिरा’ हा सिनेमा २ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूडची ब्यूटी क्वीन कतरिना कैफचा सिद्धार्थ मल्होत्राबरोबर ‘बार बार देखो’ हा सिनेमाही सप्टेंबरमध्येच प्रदर्शित होत आहे. सिनेमाच्या ट्रेलरआधी सिनेमाचे ‘काला चष्मा’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्याला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली. या सिनेमाच्या प्रदर्शनाबरोबर नवाजुद्दीन सिद्दीकी याचा ‘फिक्री अली’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. गोल्फ खेळावर आधारीत या सिनेमाचे कथानक आहे. हे दोन्ही सिनेमे ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहेत.
बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा ‘पिंक’ हा सिनेमाही याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे. सस्पेन्स थ्रीलर या प्रकारात मोडणारा हा सिनेमा १६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा एख सामाजिक संदेश देणारा आहे. अमिताभ या सिनेमात एका वकिलाची भूमिका साकारत आहेत. जेव्हा समाज त्यांना दोषी मानत असतो तेव्हा अमिताभ या सिनेमात तीन मुलींच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतात. या सिनेमा बरोबर इमरान हाश्मीचा ‘राज रिबूट’ हा भयपट ही प्रदर्शित होणार आहे.
याशिवाय रितेश देशमुख आणि नर्गिस फाख्री यांचा ‘बॅन्जो’ सिनेमा २३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर महिन्याच्या शेवटी बहूचर्चित सिनेमा ‘एमएस धोनी- अनटोल्ड स्टोरी’ ३० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणारे सिनेमे
अकिरा- २ सप्टेंबर
बार बार देखो- ९ सप्टेंबर
फीक्री अली- ९ सप्टेंबर
राज रिबूट- १६ सप्टेंबर
पिंक- १६ सप्टेंबर
बॅन्जो- २३ सप्टेंबर
डेज ऑफ ताफ्री- २३ सप्टेंबर
एमएस धोनी- अनटोल्ड स्टोरी- ३० सप्टेंबर

Mahayuti, Maval lok sabha, Maval,
मावळमध्ये महायुतीचे आज शक्तिप्रदर्शन
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
bade miyan chote miyan release date
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’चे प्रदर्शन एक दिवस पुढे ढकलले, दोन्ही चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार
Indian Merchant Navy Seaman Recruitment 2024
सुवर्णसंधी! भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये मेगा भरती! मिळेल चांगला पगार, आज करा अर्ज