आमिर खान आणि किरण राव तीन वर्षांपूर्वी विभक्त झाले. घटस्फोट घेतला असला तरी ते दोघेही चांगले मित्र आहेत. दोघेही सुख-दु:खात एकमेकांना साथ देतात. आयरा खानच्या लग्नातही किरण सहभागी झाली होती, सोमवारी दोघेही मतदानासाठी एकत्र गेले होते. त्यामुळे घटस्फोटानंतरही किरण व आमिर खूपदा एकमेकांबरोबर दिसतात. लग्नापूर्वी किरण व आमिर वर्षभर एकत्र राहिले होते, याचा खुलासा तिनेच केला आहे.

एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत किरण राव म्हणाली, “आमिर आणि मी लग्नाच्या आधी वर्षभर एकत्र राहत होतो. आम्हाला जास्त काळ एकत्र राहायचं होतं, पण आमच्या पालकांना वाटत होतं की आम्ही लग्न करून एकत्र राहावं. लग्न ही एक सुंदर गोष्ट आहे परंतु लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात की अशा परिस्थितीत महिलांना अनेकदा स्वतःसाठी कमी वेळ मिळतो, कारण त्यांनी घर सांभाळणं आणि पतीच्या कुटुंबाची नाती जपणं अपेक्षित असतं.”

एव्हरग्रीन Couple! २८ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे ऐश्वर्या व अविनाश नारकर, लग्नाचा फोटो पाहिलात का?

किरण पुढे म्हणाली, “लग्न या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता, त्याची काय व्याख्या करता हे खूप महत्त्वाचं आहे. कारण लग्न एका उद्देशासाठी असतं आणि नंतर खूप लोकांसाठी सामाजिक स्वीकार्यता महत्त्वाची असते. मुलांसाठी लग्न महत्त्वाचं असतं. लग्नामुळे तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी मिळतात. लग्न तुम्हाला एक नवीन कुटुंब देतं, ते खूप सारी नाती देतं, तसेच लग्न तुम्हाला सुरक्षिततेची आणि स्थिरतेची भावना देतं.”

‘ती’च्याशी अफेअरची चर्चा अन् ६१ वर्षांचे संजय लीला भन्साळी अद्याप अविवाहित; एकदा म्हणालेले, “ज्यांचं लग्नाचं वय उलटून…”

किरण रावने लग्नानंतर महिलांवर पडत असलेल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याबद्दल भाष्य केलं. स्त्रीने घरातील सगळी कामं करणं, संपूर्ण घर सांभाळणं ही अपेक्षा लग्नानंतर तिच्याकडून असते. “घर चालवण्याची आणि कुटुंबाला जोडून ठेवण्याची जबाबदारी महिलांवर असते. महिलांनी सासरच्या लोकांशी संपर्क ठेवणं अपेक्षित असते. महिलांनी पतीच्या कुटुंबाशी आपुलकीने, प्रेमाने वागणं अपेक्षत असतं. या अपेक्षा खूप आहेत, असं मला वाटतं. त्यामुळे या जबाबदाऱ्यांवर चर्चा होणं आवश्यक आहे, असं मला वाटतं,” असं मत किरणने मांडलं.

Video: पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलं लग्न, दुसऱ्यांदा आई झाली अभिनेत्री; बाळाचं नाव केलं जाहीर

किरणला कधी घटस्फोटाची भीती वाटायची का? असं विचारल्यावर म्हणाली, “मी माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला वेळ घालवला आणि कधीच घटस्फोटाची चिंता मला नव्हती. मी आणि आमिर दोन व्यक्ती म्हणून एका खूप मजबूत नातेसंबंधात आहोत. आम्ही एकमेकांशी जोडलेले आहोत आणि आम्हाला एकमेकांबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे, ही गोष्ट घटस्फोटानंतरही बदललेली नाही.”