बॉलीवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या त्यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. भन्साळी आता ६१ वर्षांचे आहेत, पण अजूनही अविवाहित आहेत. एकदा एका मुलाखतीत त्यांनी प्रेम व लग्नाबाबत आपलं मत व्यक्त केलं होतं.

संजय लीला भन्साळी यांनी २०१२ मध्ये एका पोर्टलला मुलाखत दिली होती. त्यात त्यावेळी ४९ वर्षांचे असलेल्या संजय यांनी म्हटलं होतं की ते अजूनही अविवाहित असून योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत. त्यांच्यामते लग्न करण्यासाठी कोणतंही आदर्श वय नाही, लग्न ही जोडप्यांवर अवलंबून असलेली गोष्ट आहे. प्रेम कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतं. एखाद्याला ४० व्या वर्षी प्रेम होऊ शकतं, तर एखाद्याला ८५ व्या वर्षी प्रेम मिळू शकतं. प्रेमाचा व वयाचा काहीच संबंध नाही, असं ते म्हणाले होते.

“मग आता निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून…”, पुण्यातील पोर्शे कार अपघाताबद्दल मराठी दिग्दर्शकाची पोस्ट

“मला बेलाची (संजय लीला भन्साळींची बहीण) प्रेमाची संकल्पना आवडते, ज्यांचं लग्नाचं वय उलटून गेलं असतं त्यांना प्रेम ४५ व्या वर्षी किंवा ८५ व्या वर्षीही होऊ शकतं. मी ४९ वर्षांचा आहे आणि मी अजूनही प्रेम होण्याची वाट पाहत आहे,” असं संजय लीला भन्साळी २०१२ मध्ये म्हणाले होते.

स्वतःच भांडी घासतो, वापरलेले कपडे घालतो अक्षय कुमारचा लेक; १५ व्या वर्षी आरवने सोडलं घर, अभिनेता म्हणाला, “त्याला पैसे…”

संजय लीला भन्साळी हे बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ते ६१ वर्षांचे असूनही अविवाहित आहेत. पण एकेकाळी त्यांच्या नात्याची सिनेसृष्टीत खूप चर्चा झाली होती. प्रसिद्ध कोरिओग्राफर वैभवी मर्चंट हिच्याबरोबर भन्साळी रिलेशनशिपमध्ये होते, असं म्हटलं जातं.

अमिताभ, जया व रेखा लाँग ड्राइव्हवर जायचे एकत्र; ‘ते’ दोघेही पुढच्या सीटवर बसायचे अन् मागे…

१९९९ मध्ये, संजय लीला भन्साळी वैभवी मर्चंटला त्यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. त्यानंतर वैभवीने २००७ ‘सांवरिया’ चित्रपटासाठी भन्साळींबरोबर काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी दोघांची जवळीकता वाढली असं म्हटलं जातं. दोघे एकमेकांसोबत सार्वजनिकपणे फिरायचे, इतकंच नाही तर या चित्रपटाच्या प्रिमिअरला संजय वैभवीबरोबर पोहोचले होते. दोघांच्या नात्याबद्दल खूप चर्चा झाल्या पण त्यांनी याबाबत मौन बाळगलं होतं.

‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका रिपोर्टनुसार, दोघांच्या कुटुंबियांच्या जवळच्या एका सूत्राने सांगितलं होतं की हे जोडपं मार्च २००८ मध्ये लग्न करणार होतं आणि त्यासाठी तयारी जोरात सुरू होती. पण नंतर ते विभक्त झाल्याची बातमी आली. दोघांनी वैयक्तिक मतभेदांमुळे लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि ते वेगळे झाले होते.