Premium

“माझ्या प्रिय बाळाच्या बाळाला…”, नातवासाठी आजी रवीना टंडनची खास पोस्ट; गोंडस फोटो केले शेअर

रवीना टंडनचा नातू दिसतो खूपच क्युट, तुम्ही फोटो पाहिलेत का?

raveena tandon grandson birthday
रवीना टंडनची नातवाच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट (फोटो – रवीना टंडन इन्स्टाग्राम)

अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडियावर वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असते. तिने नुकतीच तिच्या नातवासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. नातवाच्या वाढदिवसानिमित्त तिने शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. इतकंच नाही तर तिने नातवाचे व मुलीचे फोटोही शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“त्यांना वाटत असेल की मी खूप…”, ‘वेलकम टू द जंगल’चा भाग नसण्याबद्दल स्पष्टच बोलले नाना पाटेकर

रवीना टंडनने अनिल थडानींशी लग्न केलं. पण त्यापूर्वी १९९५ मध्ये ती अवघी २१ वर्षांची असताना तिने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. तिच्या या दोन्ही मुली आता विवाहित आहेत. रवीनाने तेव्हा ११ वर्षांची छाया आणि ८ वर्षांच्या पूजाला दत्तक घेतलं होतं. तिच्या या मुलींची लग्नं झाली असून छायाला रुद्र नावाचा मुलगा आहे. त्याच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त रवीनाने पोस्ट शेअर केली आहे.

आईला ‘या’ नावाने हाक मारतो गश्मीर महाजनी; म्हणाला, “माझे वडील त्यांच्या आईला…”

“माझ्या प्रिय बाळाच्या बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्या प्रिय रुद्र, तुला चौथ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! महादेवाच्या कृपेने तुझं आयुष्य सदैव प्रेम आणि आनंदाने, वैभवाने आणि यशाने उजळून निघो. आयुष्मान भव” सुखीभव.. तुझीच आजी,” असं कॅप्शन देत रवीनाने रुद्रचे १० फोटो शेअर केले आहेत.

रवीनाच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी रुद्रला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raveena tandon post for grandson rudra on his birthday shares his cute photos hrc

First published on: 13-09-2023 at 12:01 IST
Next Story
जितेंद्र आव्हाडांसह बघा शाहरुखचा ‘जवान’; मुंब्रा व कळव्यातील तरूणांना मोफत तिकिटांचे वाटप