मानसी जोशी, लोकसत्ता

नवरात्री आणि दसरा झाल्यावर छोटय़ा पडद्याला आता दिवाळीचे वेध लागले आहेत. टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर जुलैमध्ये राज्य शासनाने जारी के लेले करोना संदर्भातील सर्व नियम पाळत मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले. सततच्या प्रवासामुळे सेटवर कलाकार तंत्रज्ञांना करोनाची बाधा होण्याच्या वारंवार घटना घडल्याने अनेक निर्मात्यांनी खबरदारी घेत सेटवर अथवा त्या जवळील परिसरात त्यांची राहण्याची व्यवस्था केली. गेल्या चार महिन्यापासून अनेक मालिकांचे कलाकार आणि तंत्रज्ञ सेटवरच तळ ठोकून आहेत. यंदा बहुतेक मालिकांमध्ये आधीच भाग चित्रित करून कलाकार आणि तंत्रज्ञांना दिवाळीचे चार दिवस सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे एका प्रदीर्घ कालावधीनंतर मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यंदा सण-समारंभावर करोनाचे सावट असले तरीही मालिकांमध्ये दणक्यात दिवाळी साजरी केली जात आहे. यानिमित्ताने काही मालिकांमध्ये उत्साहाचे वातावरण तर काहींमध्ये नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Chillar Party, Chillar Party Celebration Twelfth Anniversary, Special Children Film Screening , Chillar Party with Special Children Film Screening, Special Children Film Screening in Kolhapur, Kolhapur news, children special film Kolhapur, Kolhapur news, Chillar Party news, marathi news,
चिल्लर पार्टीचा बारावा वर्धापन दिन दुर्गम वाड्यावस्त्यांतील मुलांसोबत
gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर

झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनाया ‘राधिका मसाले’ची मुख्य कार्यकारी संचालक बनल्यावर प्रथमच लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशी साजरी करणार आहे. राधिका – आनंद भावोजी आणि शनाया – सौमित्र यांची भाऊबीजही मालिके त साजरी होणार आहे. या वेळेस गेले काही दिवस सातत्याने सेटवर राहून काम करणाऱ्या मालिकेतील संपूर्ण कलाकार-तंत्रज्ञांच्या टीमला दिवाळीनिमित्ताने भेटवस्तू देण्यात आल्या. ‘माझा होशील ना’मध्ये आदित्य आणि सईमधील नाते आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. ब्रrो घराची सून बनण्याच्या दिशेने सईचा प्रवास सुरू झाला आहे. स्वयंपाकाचा जराही गंध नसलेली सई फराळ करण्याच्या निमित्ताने ब्रrोंकडे येते. तेव्हा आप्पांनी आदित्यच्या सुनेसाठी ठेवलेल्या बांगडय़ा सईला देतात. आदित्य आणि सईच्या नात्यासाठी आशेचा किरण निर्माण होत असताना दापोलीला गेलेला दादामामा आदित्यचं मेघनाशी लग्न ठरवतो. आदित्य आणि सई आपल्यातील मैत्रीला वेगळे नाव देतील का? त्यांच्यात असलेल्या नात्याचं गांभीर्य त्यांना समजेल का? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढील भागात पाहावयास मिळणार आहेत. मेघनाशी होणारं लग्न मोडून आदित्य सईवर प्रेम असल्याचं जाहीर करेल का आणि या सगळ्याचा ब्रrोंच्या घरावर काय परिणाम होईल हे पाहणं या दिवाळीत रंजक ठरेल.

दसऱ्याच्या मुहूर्तावर कलर्स मराठी वाहिनीवर दाखल झालेल्या ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेत चिमणराव आणि कावेरीचे कुटुंब धूमधडाक्यात दिवाळी साजरी करणार आहेत. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत लतिका आणि अभिमन्यूचीही लग्नानंतरची पहिलीच दिवाळी असल्याने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या घरात कोण फराळ करणार?  याची चर्चा सुरू आहे. ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेत यशवंत लष्करे यांच्या आगमनाने कुटुंबात उत्साह संचारला आहे. शिवा आणि सिद्धी आता बाबांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. तर झी युवावरील ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ मालिकेत दिवाळी साजरी करतानाच पाडव्याच्या दिवशी सईला नचिकेत परत ऑस्ट्रेलियाला जाण्याचा विचार करत असल्याचे समजते. अचानक मिळालेल्या या धक्क्याने सई हादरून जाते. नचिकेत लवकरच ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याचे समजताच सईची काय प्रतिक्रिया असेल हा धक्का पचवावा लागणार आहे.

दिवाळीच्या निमित्ताने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरही ‘कॉमेडी बिमेडी’ हा नवा कार्यक्रम दाखल होतो आहे. अतुल तोडणकर, मंगेश देसाई, किशोरी अंबिये, संतोष पवार, कमलाकार सातपुते असे १६ विनोदवीर या कार्यक्रमातून विनोदी स्किट्स सादर करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. हा स्पर्धात्मक कार्यक्रम नसल्याने ना परीक्षक-ना स्पर्धक अशा या खास कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे सूत्रसंचालन मकरंद अनासपुरे आणि कविता लाड मेढेकर करणार आहेत. १५ नोव्हेंबरला ऐन दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात निर्मिती सावंत, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, विकास समुद्रे, विजय पटवर्धन, सुप्रिया पाठारे, अतुल आणि सोनिया परचुरे ही मंडळी विनोदाची बहार उडवून देणार आहेत. एकंदरीतच मालिका आणि कार्यक्रमांच्या निमित्ताने करोनाकाळात प्रेक्षकांच्या मनावर आलेला ताण आणि मरगळ काढून टाकण्याचा प्रयत्न वाहिन्यांकडून के ला जातो आहे. मालिकांमधील घरांमध्ये रंगणाऱ्या या दिवाळीचा गोडवा प्रेक्षकांची दिवाळीही आनंददायी करणार यात शंका नाही.