झी युवावरील लोकप्रिय मालिका ‘डॉक्टर डॉन’ मधील कलाकार देखील तितकेच लोकप्रिय आणि प्रेक्षकांचे लाडके आहेत. ही मालिका सुरुवाती पासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.

देवा आणि डॉलीबाई सोबतच या मालिकेतील प्रेक्षकांची अजून एक आवडती जोडी म्हणजे राधा आणि कबिरची. या भूमिका साकारणारे कलाकार म्हणजे अभिनेता अनुराग वरळीकर आणि अभिनेत्री प्रज्ञा चवंडे हे ऑनस्क्रीन जितकी धमाल करतात तितकीच ऑफस्क्रीन देखील करतात. मालिकेत सध्या मोनिका आणि विक्रांतच्या लग्नाची लगबग सुरु आहे आणि लग्न म्हंटल कि लग्नाची जोरदार तयारी देखील आली, लग्नात उठून दिसण्यासाठी भरजरी पारंपरिक कपड्यांची खरेदी सुद्धा आली.

job application from blinkit viral photo
पट्ठ्याने Blinkit चा वापर चक्क नोकरी मिळवण्यासाठी केला! सोशल मीडियावर ‘हा’ Photo होतोय व्हायरल…
NLC India Limited hiring 2024
NLC Recruitment 2024 : NLC इंडिया लिमिटेडमध्ये होणार ‘या’ पदांवर मोठी भरती! पाहा माहिती
chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
Bengaluru man’s post on BMTC bus conductor
बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल

अशाच एका कार्यक्रमासाठी राधा आणि कबीर यांनी छान निळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. राधाने निळ्या रंगाचा सुंदर लेहंगा तर कबीरने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला आहे. दोघांनी सारख्याच रंगाचे कपडे घालून सोशल मीडियावर त्यांचे फोटोज त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. यात त्यांची जोडी एकदम उठून दिसतेय. त्यांचा हा ट्विनिंग गेम अगदी ऑन पॉईंट असल्याचं कबीर म्हणजेच अनुराग वरळीकर याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या या लुकवर चाहते फिदा झाले असून त्यांचा हा ट्विनिंग गेम देखील प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे.