निर्माती एकता कपूरने सोशल मीडियावर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पहिल्यावहिल्या मालिकेतील एका सीनचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मालिकेतील सुशांतच्या एण्ट्रीचा हा व्हिडीओ आहे. 'किस देश मै है मेरा दिल' ही सुशांतची पहिली मालिका होती. यात त्याने प्रीत जुनेजा हे पात्र साकारलं होतं. हा व्हिडीओ पोस्ट करत एकताने लिहिलं, 'मला अनेकजण सुशांतच्या पहिल्या सीनविषयी विचारत होते. आम्ही शूट केलेला हा त्याचा पहिला सीन होता. किस देश मे है मेरा दिल या मालिकेतला त्याचा हा पहिला सीन आहे. या मालिकेतील त्याने मुख्य भूमिका साकारली नसली तरी ती भूमिका मुख्य भूमिकेइतकीच महत्त्वाची होती. याहून खूप मोठं काम करण्यासाठी तो या इंडस्ट्रीत आला आहे हे आम्हाला तेव्हाच कळून चुकलं होतं आणि त्याने ते सिद्ध केलं. तुला खूप खूप प्रेम आणि प्रार्थना.' View this post on Instagram Lots of people were asking me about Sushant’s first scene. this was the first scene we shot with him. This was his 1st scene on Television which went on-air in a show called ‘Kis Des Mein Hai Mera Dil’. He was the 2nd lead in that show, but we knew he was meant for greater things and he went and did just that. Lots of love, peace and prayers for this beautiful, beautiful piece of light and shining soul. A post shared by Erkrek (@ektarkapoor) on Aug 6, 2020 at 11:26pm PDT आणखी वाचा : श्रुती मोदी आहे तरी कोण? सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येची घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी आता सीबीआय चौकशी करत आहे. त्याची कथित प्रेयसी व अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह पाच जणांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.