देशभरात बलात्कार, विनयभंग, छेडछाड यांसारख्या घटनांचे पेंव फुटले असताना या सर्वाच्या मागे असलेल्या कारणावर नेमकेपणाने बोट ठेवणारा ‘बीपी’ अर्थात ‘बालक-पालक’ हा चित्रपट काळाची गरज असल्याचे मत या चित्रपटाचे कथा, पटकथा व संवाद लेखक अंबर हडप व गणेश पंडित या लेखकद्वयीने व्यक्त केले. हा चित्रपट लैंगिक शिक्षणाची गरज, या विषयावर भाष्य करतो. नेमक्या याच गोष्टीच्या अभावामुळे समाज आज या फेऱ्यात अडकला आहे, असे ते म्हणाले. ‘बीपी’ची टीम रूईया महाविद्यालयाच्या महोत्सवात भेट द्यायला आली असता अंबर आणि गणेश या दोघांनी ‘लोकसत्ता’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
आयएनटी या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत आमची एकांकिका पहिली येण्याआधीच रवि जाधवने आम्हाला हा विषय कोणालाही न देण्याबद्दल बजावले होते. एकांकिका पहिली आल्यावर अनेक नाटय़निर्मात्यांनी या एकांकिकेचे नाटक करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र रविने त्या वेळी आम्हाला समजावले. नाटकापेक्षा चित्रपट जास्त लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचू शकतो. तसेच आता काम करणारी मुले मोठी झाल्यावर त्यांना त्या नाटकात भूमिका करता येणार नाहीत, अशा अनेक गोष्टी रविने आम्हाला सांगितल्या. आम्हालाही त्या पटल्याने आम्ही चित्रपट करण्याची तयारी दर्शवल्याचे दोघे म्हणाले.
दिल्लीत झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर दर दिवशी किमान एक तरी बलात्कार किंवा विनयभंग यांची बातमी बाहेर कानावर येत आहे. लैंगिक शिक्षणाचा अभाव, दुसऱ्याच्या शरीराबद्दल आदराच्या भावनेचा अभाव या गोष्टी वरील गुन्ह्यांना कारणीभूत आहे. ‘बालक-पालक’ नेमका याच गोष्टीवर प्रकाश टाकतो. आमच्या चित्रपटाचा काळ १९८५च्या आसपासचा आहे. त्या वेळी व्हिडिओ कॅसेटशिवाय इतर कोणतेही साधन नव्हते. मात्र आता प्रत्येकाच्या हातात मोबाइल आणि मोबाइलमध्ये इंटरनेट सुविधा आहे. त्यामुळे आता तर लैंगिक शिक्षणाची गरज जास्त आहे, असेही या दोघांनी सांगितले.
आमच्या चित्रपटाची झलक यूटय़ुबवर आल्यापासून तब्बल ८० हजार लोकांनी ती लाइक केली आहे. त्यापेक्षा जास्त लोकांनी ती बघितली आहे. त्यामुळे या विषयाबाबत उत्सुकता आहे, हे नक्की. आता हा चित्रपट ४ जानेवारी रोजी प्रदर्शित झाल्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आपले लक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तरुणपणीच ‘बीपी’
National Cinema Day 2023
‘राष्ट्रीय चित्रपट दिना’निमित्त केवळ ९९ रूपयांमध्ये पाहता येणार चित्रपट; कुठे करता येणार बुकिंग? जाणून घ्या
तरुणाईचा बीपी
russion yutuber harrassed by indian man
“तू खूप सेक्सी आहेस, माझं स्वप्न…”; भारतीय तरुणाकडून रशियन युवतीचा विनयभंग, VIDEO व्हायरल