Health Special मॅडम, मला पाठीची हालचाल करण दिवसेंदिवस अवघड जातंय, कणा जाम झाल्यासारखा वाटतो, रात्री वेदनेमुळे जाग येते, झोप नीट होत नाही मग दिवसभर अजूनच त्रास होतो, अवघे ३२ वर्षे वय असलेला निशांत मला काकुळतीने सांगत होता. निशांत, आपल्याला माहिती आहे की, असे फ्लेअर अप्स होणार आहेत. आपण आज तुझ्या वेदना कमी करूया आणि आपले सोपे स्ट्रेचेस आणि हालचाली करूया, थोडा संयम ठेव, हे पूर्ण बरं होणार नसलं तरी आटोक्यात निश्चितच ठेवता येणार आहे… -इति मी

पण मीच का?

निशांतला तीन वर्षांपूर्वी अंकायलोसिंग स्पॉन्डीलायटीस नावाच्या आजाराचं निदान झालं होतं, तेव्हापासून त्याने व्यायाम, वेदना व्यवस्थापन, औषध, आहार आणि योग्य दृष्टिकोन यांची व्यवस्थित सांगड घालून हा आजार बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवला होता. पण या आजाराच्या स्वभावाला अनुसरून फ्लेअर अप्स आले की, निशांत हतबल होऊन जायचा आणि पुनः ‘मी का’ हा प्रश्न डोक वर काढायचा…

satyapal malik meets uddhav thackeray at matoshree
Satyapal Malik: विधानसभेत भाजपाचा सुपडा साफ होणार; उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भाजपाच्या माजी नेत्याची घणाघाती टीका
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Aseem Sarode on Badlapur Case
Badlapur Sexual Assualt : “पीडितेच्या पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न”, असीम सरोदेंचा मोठा दावा
What Rajiv kumar Said?
Maharashtra Election 2024 : “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख…”, निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काय सांगितलं?
jayant patil appeal bachchu kadu
Jayant Patil : राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु असतानाच जयंत पाटलांचे बच्चू कडूंना आवाहन; म्हणाले…
Sarpanch Upasarpanch Salary
Sarpanch Salary Hike : सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य सरकारचे २४ मोठे निर्णय
Ajit pawar and Sharad Pawar
Ajit Pawar : “मी शरद पवारांच्या डोळ्यांत डोळे घालून…”, अजित पवारांच्या विधानाची चर्चा!
Nitin Gadkari
Nitin Gadkari : “अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही, कारण लाडकी बहीण योजना…”, नितीन गडकरींच्या विधानाची चर्चा

हेही वाचा : नाक शिंकरल्याने ‘असा’ वाढू शकतो त्रास! बंद नाक मोकळे करण्यासाठी योग्य उपाय कोणते? तज्ज्ञांनी सांगितलं उत्तर

HLAB27 हे जनुक असलेल्या व्यक्तींमध्ये अंकायलोसिंग स्पॉन्डीलायटीस हा आजार होण्याची शक्यता असते. हा आजार पूर्ण बरा होणारा नाही. म्हणजेच हा आजार इर्रिव्हर्सिबल आहे. प्रामुख्याने पाठीचा कणा आणि माकड हाड यांना लक्ष्य करणारा हा आजार वेदनादायक तर आहेच. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुग्णाच्या आयुष्याची गुणवत्ता कमी करणारा आहे. आपल्याला कोणतंही इन्फेक्शन झालेलं नसताना, कोणतीही इजा झालेली नसताना, फक्त सामान्य वाटणाऱ्या कंबरदुखी वरुन सुरू झालेला आजार आता आपल्यासोबत आयुष्यभर राहणार आहे, हे रुग्णाने स्वीकारणं ही सगळ्यात आव्हानात्मक आणि अवघड गोष्ट असते; ही गोष्ट साधली की पुढचा प्रवास नक्की सोपा होतो.

आजाराची लक्षणं

-साधारणपणे वयाच्या ४५ वर्षांच्या आत या आजाराची लक्षण दिसू लागतात.
-साधारणपणे तीन महिन्यांपासून सतत राहणारी आणि वाढत जाणारी कंबरदुखी, प्रामुख्याने कंबरेचा भाग आणि माकड हाडाला होणाऱ्या वेदना
-कंबरेतून खाली वाकण, कंबरेतून मागे वाकण, कंबरेतून वळण या क्रिया सुरुवातीला त्रासदायक होऊन हळू हळू मर्यादीत होऊ लागतात
-पाठीचा मणके आणि स्नायू यामध्ये जाणवण्याइतपत कडकपणा येतो आणि तो वाढत जातो. त्यामुळे आपोआपच हालचाल कमी होते ज्यामुळे वेदना वाढतात, वेदना वाढल्यामुळे रुग्ण हालचाल करण्यास निरुत्साही असतात ज्यामुळे पुनः कडकपणा वाढत जातो हे चक्र अव्याहतपणे सुरू राहतं.
-खूप वेळ एकाच स्थितित राहिल्याने वेदना वाढतात, स्थिती बदलून शरीराची आणि पायांची हालचाल केल्याने त्या कमी होतात, यामुळे प्रामुख्याने रुग्णाच्या झोपेचा प्रश्न निर्माण होतो, झोपेत शरीर खूप काळ एक स्थितीत राहिल्याने वेदना वाढून रुग्णाला वारंवार जाग येते.

हेही वाचा : Health Special: उन्हाळ्यात शरीरातले पाणी घटते आहे ते कसे ओळखाल? काळजी कशी घ्याल?

  • या आजाराच्या नंतरच्या स्तरात पाठीतील मणक्यामधील जागा कमी कमी होत जाते आणि मणके एकमेकांच्या जवळ येतात, या वेळी पाठीचा X-Ray केला असता पाठीतील मणके बांबूच्या खोडा प्रमाणे दिसतात यालाच वैद्यकीय भाषेत ‘बांबू स्पाईन’ असं म्हणतात.
  • प्रामुख्याने कंबरेपासून सुरू झालेला आजार नंतर वरची पाठ आणि मानेपर्यंत वेदना आणि कडकपणा निर्माण करतो, मानेच्या हालचाली होईनशा झाल्या की रुग्ण अधिकच चिंतित होतात.
  • काही वेळा यात छातीच्या फासळ्या सुद्धा कडक होऊन जातात त्यामुळे श्वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
  • सततच्या वेदना आणि त्यामुळे आयुष्य जगताना येणाऱ्या मर्यादा यामुळे रुग्ण हतबल होऊन जातात.

आजारावरचे उपाय

संवाद

आधी सांगितल्याप्रमाणेच, हा आजार पूर्णपणे बरा होणारा नाही, मात्र हे तथ्य रुग्णांना योग्य रीतीनं सांगणं आवश्यक असतं. फिजिओथेरपिस्ट रुग्णांशी व्यवस्थित संवाद साधतात. काय केल्याने हा आजार नियंत्रणात राहू शकतो आणि आयुष्य गुणवत्तापूर्ण होऊ शकतं, याची विस्तृत माहिती देतात. यामुळे रुग्णांची हतबलता कमी होते. आणि ते आजाराकडे आशावादी आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहू लागतात.

एरोबिक व्यायाम

प्रत्येक रुग्णाला अनुरूप असे ह्दय आणि फुप्फुसांची क्षमता वाढवणारे व्यायाम सांगितले जातात. यात चालण, पोहणं, सायकल चालवणं यांचा समावेश होतो.
याव्यतिरिक्त,

हेही वाचा : Health Special: रजोनिवृत्तीमुळे होणारे त्रास कोणते? काळजी कशी घ्याल?

एक्झरसाइज थेरपी

प्रत्येक रुग्णाला अनुसरून पाठीच्या, पोटाच्या आणि पायांच्या स्नायूंची शक्ती वाढवणारे व्यायाम, चपळता वाढवणारे व्यायाम, तोल आणि सुसूत्रता वाढवणारे व्यायाम. पोटाचे स्नायू जास्तीत जास्त कार्यान्वित होतील असे ‘फंक्शनल कोअर’ (functional core) व्यायाम. हे व्यायाम किती तीव्रतेने, किती वेळा आणि कसे करावे हेही रुग्णाला शिकवलं जातं.

लाइफस्टाईल मॉडीफिकेशन

दैनंदिन आयुष्यात करावयाचे बदल, झोप, आहार, मानसिक ताण, स्थूलता यांचं व्यवस्थापन.

एरगोनॉमिक मोडीफिकेशन

कामाच्या ठिकाणी करायचे बदल, किती वेळाने ब्रेक्स घ्यायला हवेत, त्याठिकाणी करता येतील असे सोपे व्यायाम, स्ट्रेचेस, याबद्दलचं प्रशिक्षण.