पाय आपोआप थिरकवायला लावणारी गाणी आणि आगळं वेगळं नाव यामुळे ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमातले पहिले गाणे ‘डॉल्बीवाल्या’ नुकतेच प्रदर्शित झाले. अजय- अतुलचे संगीत असलेले हे गाणे त्यांच्या आतापर्यंतच्या गाण्यांपेक्षा वेगळे आहे. या गाण्यात गिरीश कुलकर्णी वरातीमध्ये वराच्या पोशाखात दिसतो आहे. या गाण्यात भाऊ कदमही दिसतो आहे. डीजेच्या तालात आणि अजय- अतुलच्या रंगात हे ‘डॉल्बीवाल्या’ गाणं सुरु होतं.
गिरीश कुलकर्णीचं ताकदीचं लेखन आणि गिरीशच्याच नजरेतून झालेलं काटेकोर दिग्दर्शन आणि सिनेमातील प्रमुख भूमिकेत त्याचा झालेला कसदार अभिनय या भन्नाट रेसेपितून निर्माण होणारी डिश म्हणजे सिनेखवैयांना एक चमचमीत मेजवानी असणार आहे. शिवाय गिरीश बरोबर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, रिमा, दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर, मनवा नाईक, पूर्वा पवार, नंदकिशोर चौगुले, श्रीकांत यादव, सविता प्रभूणे, भाऊ कदम, स्पृहा जोशी अशी सरस आणि अनुभवी कलाकारांची फौज या सिनेमात पाहायला मिळणार आहे. एच. एम. रामचंद्र यांचं छायांकन, अभिजित देशपांडे याचं संकलन, अनमोल भावेच ध्वनी आरेखन, अशी कुशल तांत्रिक टीम या सिनेमाच्या निर्मितीसाठी काम करतेय आणि अजून एक खास आकर्षण म्हणजे अजय-अतुल या आघाडीच्या आणि दिग्गज संगीतकारांच्या हातात सिनेमाचे संगीत आहे.
अजय- अतुल हे निर्माते म्हणून देखील या सिनेमातून जोरदार आगमन करत आहेत! अजय अतुल यांच्यासह ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’या सिनेमाची निर्मिती केलेल्या पूनम शेंडे, अनुमती, पोस्टकार्ड, हाय-वे चित्रपटाची निर्मिती केलेले विनय गानू, ‘वळू’ आणि ‘गाभ्रीचा पाऊस’चे निर्माते प्रशांत पेठे आणि उमेश कुलकर्णी असे मराठीतले मोठे निर्माते या सिनेमाशी जोडले गेले आहेत.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
washim lok sabha seat, Govinda s Roadshow in Washim, Receives low Response, mahayuti, canidate rajshri patil, election campaign, govinda Disappointed Fans,
गोविंदाचा रोड शो फसला, कारमध्येच बसून असल्याने नागरिकांची नारेबाजी…..